सनातन धर्मातील अंधश्रद्धा दूर करणार
By admin | Updated: August 19, 2015 22:27 IST
योगगुरू आनंदगिरी महाराज : योग शिबिरासह धार्मिक कार्यक्रम
सनातन धर्मातील अंधश्रद्धा दूर करणार
योगगुरू आनंदगिरी महाराज : योग शिबिरासह धार्मिक कार्यक्रम नाशिक : सनातन हिंदू धर्मात अनेक अंधश्रद्धा असल्याने लोकांची धर्माविषयी आस्था कमी होत आहे. यासाठी योग शिबिराच्या माध्यमातून युवावर्गाचे धार्मिक व आध्यात्मिक प्रबोधन करणार असल्याचे मत प्रयाग येथील श्री मॉँ गंगा निर्मल संरक्षण समितीचे योगगुरू आनंदगिरी यांनी केले.चोपडा लॉन्स येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना आनंदगिरी म्हणाले की, महात्मा किंवा साधू कधी भगवान होऊ शकत नाही. त्यांचे कार्य केवळ समाजात जागृती निर्माण करण्याचे असते. काही महाराजांनी चमत्कार दाखविण्याचे प्रकार सुरू केल्याने अंधश्रद्धा वाढीस लागली आहे. यासाठी सिंहस्थ काळात शुक्रवार (दि.२१) पासून महिनाभर योग शिबिर, रुद्र महायज्ञ, विष्णू महायज्ञ, राम महायज्ञ, संत्सग तसेच धर्मसंमेलन व धार्मिक कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती आनंदगिरी यांनी दिली.