शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

 आपचा कुमार विश्वास यांना दणका, राजस्थानच्या प्रभारी पदावरून हटवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2018 14:14 IST

गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असलेल्या कुमार विश्वास यांना आपने दणका दिला आहे. पक्षाने  कुमार विश्वास यांना राजस्थानच्या प्रभारीपदावरून हटवले असून, दीपक वाजपेयी यांची पक्षाचे नवे राजस्थान प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असलेल्या कुमार विश्वास यांना आपने दणका दिला आहे. पक्षाने  कुमार विश्वास यांना राजस्थानच्या प्रभारीपदावरून हटवले असून, दीपक वाजपेयी यांची पक्षाचे नवे राजस्थान प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. या निर्णयामुळे आधीच पक्षात एका बाजूला पडलेले कुमार विश्वास आता केवळ पक्षाचे संस्थापक सदस्य उरले आहेत.  दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यासोबत कुमार विश्वास यांचे उघड मतभेत आहेत. त्यामुळे पक्षाने त्यांना नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी सुद्धा दिली नव्हती. इतकेच नाही तर अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये त्यांना डावलून पक्षाच्यावतीने बोलण्याची संधीसुद्धा देण्यात आली नव्हती. या वर्षाच्या अखेरीस राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूक होणार असून, या निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने कंबर कसली आहे. दरम्यान, बुधवारी आपचे नेते आणि माजी पत्रकार आशुतोष यांनी  कुमार विश्वास यांना आपच्या राजस्थान प्रभारी पदावरून हटवण्यात आल्याची घोषणा केली. कुमार विश्वास यांच्याकडे पक्षासाठी फारसा वेळ उपलब्ध नसतो. त्यामुळे त्यांना पक्षाच्या प्रभारीपदावरून हटवण्यात आले आहे, असे आशुतोष यांनी सांगितले. कुमार विश्वास यांच्या जागी राजस्थान प्रभारीपदी नियुक्त करण्यात आलेले दीपक वाजपेयी हे आपमधील चर्चित चेहऱ्यांपैकी नाहीत. मात्र त्यांना अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय मानले जाते. ते पक्षाचे कोषाध्यक्ष असून,  आपचे सर्वोच्च कार्यकारिणी संस्था असलेल्या पॉलिटिकल अफेअर्स कमिटीचे ते सदस्य आहेत.   

टॅग्स :AAPआपRajasthanराजस्थानPoliticsराजकारण