एसपीजीला केली विनंती
नवी दिल्ली : विमानतळावर आपल्यासह कुटुंबीयांना सुरक्षा तपासणीत मिळणारी सवलत मागे घेण्याची विनंती प्रियंका गांधी-वड्रा यांनी केंद्र सरकारच्या विशेष संरक्षण दलाला (एसपीजी) पत्राद्वारे केली आहे.
सरकार प्रियंका आणि पती रॉबर्ट वड्रा यांची विमानतळावरील विशेष सुविधा परत घेण्याबद्दल विचार करीत असल्याचे वृत्त आले होते. त्या पार्श्वभूमीवर प्रियंका यांनी एसपीजीकडे ही विनंती केली आहे. प्रियंका यांनी एसपीजी प्रमुख दुर्गा प्रसाद यांना लिहिलेल्या पत्रात रॉबर्ट वड्रा यांचे विमानतळावरील विशेष सुविधा काढून टाकण्याबद्दल विचार करण्यात येत असल्याचा वृत्ताचा संदर्भ दिला आणि तसे लवरात लवकर केल्यास आपल्याला आनंदच होईल, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. विमानतळावरील विशेष सुविधा मिळणार्यांच्या यादीत रॉबर्ट वड्रा यांचे नाव या पूर्वीचे एसपीजी प्रमुखांनी समाविष्ट केले होते. त्यासाठी आमच्या पैकी कुणीही विनंती केली नव्हती, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.