शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

राम मंदिर प्रत्यक्ष साकारण्यामागील पाच लाेकांचे उल्लेखनीय याेगदान; कोण आहेत ते?, पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2024 11:40 IST

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मंदिर निर्माणाचे कार्य आणखी वेगाने सुरू हाेईल

राम मंदिरात श्रीरामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अयाेध्या नगरी सज्ज झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मंदिर निर्माणाचे कार्य आणखी वेगाने सुरू हाेईल. सर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर राम मंदिर ट्रस्ट स्थापन करण्यात आले. तेव्हापासून आताच्या प्राणप्रतिष्ठा साेहळ्यापर्यंत अनेक लाेकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. यामध्ये पुढील पाच लाेकांचे याेगदान उल्लेखनीय राहिले. त्यांच्याबाबत जाणून घेऊ या...

महंत नृत्य गाेपाल दासनृत्य गाेपाल दास हे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. अनेक दशकांपासून ते राम मंदिर आंदाेलनाच्या संरक्षकाच्या भूमिकेत राहिले आहेत. नृत्य  यांचा जन्म ११ जून १९३८ राेजी मथुरा येथे झाला. वयाच्या १२व्या वर्षीच त्यांनी संन्यास घेतला आणि अयाेध्येत दाखल झाले. मंदिर निर्माणासाठी देणगी गाेळा करण्यापासून अनेक कामे त्यांच्याच नेतृत्वात हाेतात. 

नृपेंद्र मिश्रानृ पेंद्र मिश्रा हे राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे मंदिर निर्माण कार्याची अतिशय महत्त्वाची जबाबदारी आहे. ते १९६७च्या तुकडीचे माजी सनदी अधिकारी असून, २०१४ मध्ये ते पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचे प्रधान सचिव हाेते. मंदिर ठरलेल्या कालमर्यादेत विनाअडथळा पूर्ण भव्यतेने तयार व्हावे, यासाठीच मिश्रा यांना अध्यक्ष बनविण्यात आले आहे.

के. पराशरण स र्वाेच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील के. पराशरण हे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य आहेत. ९२ वर्षांचे वय असूनही ते अनेक तास सर्वाेच्च न्यायालयात हिंदू पक्षाच्या बाजूने युक्तिवाद करत. मंदिराच्या बाजूने निर्णय लागण्यामागे त्यांचे फार माेलाचे याेगदान हाेते. त्यांना ‘श्रीरामाचे हनुमान’ असेही म्हटले गेले. पराशरण यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्काराने गाैरविण्यात आलेले आहे.

चंपत रायविश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष चंपत राय हे प्रदीर्घ कालावधीपासून राम मंदिर आंदाेलनाशी जुळलेले आहेत. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे ते  सरचिटणीस आहेत. ट्रस्टची बैठक असाे किंवा राम मंदिराशी संबंधित एखादा मुद्दा, चंपत राय हेच प्रत्येक गाेष्ट अधिकृत करतात. आंदाेलनाला राष्ट्रव्यापी जनआंदाेलन बनविण्यात राय यांची भूमिका महत्त्वाची राहिली. 

गाेविंददेव गिरी महाराजस्वामी गाेविंददेव गिरी महाराज हे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे काेषाध्यक्ष आहेत. मंदिर निर्माणासाठी गाेळा करण्यात आलेल्या देणगीचा संपूर्ण हिशेब त्यांच्याकडे आहे. देवगिरी महाराज यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यात वर्ष १९४९ मध्ये झाला. त्यांनी वयाच्या १७व्या वर्षापासून प्रवचन करणे सुरू केले हाेते. अनेक पाैराणिक ग्रंथांवर ते देशविदेशात प्रवचन करतात. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या