तुळापूरच्या मंदिरात धार्मिक कार्यक्रम

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:12+5:302015-02-18T00:13:12+5:30

लोणी कंद : पूजा, अभिषेक, प्रवचन, हरिकीर्तन, संगीत भजन आणि अखंड हरिनाम सप्ताह अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी महाशिवरात्र साजरी करण्यात आली.

Religious programs in Tulapur temple | तुळापूरच्या मंदिरात धार्मिक कार्यक्रम

तुळापूरच्या मंदिरात धार्मिक कार्यक्रम

णी कंद : पूजा, अभिषेक, प्रवचन, हरिकीर्तन, संगीत भजन आणि अखंड हरिनाम सप्ताह अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी महाशिवरात्र साजरी करण्यात आली.
श्री क्षेत्र तुळापूर (ता. हवेली) येथील भीमा इंद्रायणी या त्रिवेणी संगमावरील श्री संगमेश्वर मंदिरात भाविकांची रांग लागली होती. सुमारे वीस हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
सकाळी उद्योजक रामशेठ गावडे यांच्या हस्ते अभिषेक झाला. श्री खंडेरायाची पालखीची मिरवणूक काढण्यात आली. यानंतर गणेश महाराज फरताळे यांचे प्रवचन झाले. तर किरण महाराज भागवत यांचे कीर्तन झाले. सरपंच जयश्री शिवले, उपसरपंच पंडित शिवले, संतोष शिवले, संजय शिवले, गणेश पुजारी, नवनाथ शिवले आदींनी परिश्रम घेतले.
अखंड हरिनाम सप्ताहात वीणापूजन उपसरपंच पंडित शिवले व आनंदा बोत्रे यांच्या हस्ते झाले. रोहिदास हांडे(आळंदी), कांचनमाला निमसे (खेड), विद्याताई जगताप (पारगाव), बाळासाहेब शेवाळे (आळंदी), गीतांजली झेंडे (पुरंदर), शंकर सुरसे यांची कीर्तन सेवा झाली.
पोपट शिवले, जयवंत शिवले, काळूराम राऊत, विठाबाई गोसावी आदीसह इतर कार्यकर्त्यांनी संयोजन केले.
फोटो ओळ : महाशिवरात्रनिमित्त संगमेश्वर मंदिरात (तुळापूर) भजनात दंग झालेले भाविक. छाया : के. डी. गव्हाणे

Web Title: Religious programs in Tulapur temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.