धर्म-अध्यात्म

By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:20+5:302015-02-13T00:38:20+5:30

प्रज्ञा पुराण कथेचे समापन

Religion-spirituality | धर्म-अध्यात्म

धर्म-अध्यात्म

रज्ञा पुराण कथेचे समापन
फोटो आहे.
नागपूर : अखिल विश्व गायत्री परिवारच्या दक्षिण विभागाच्यावतीने लाडीकर राममंदिर, मानेवाडा येथे आयोजित प्रज्ञा पुराण कथेचे नुकतेच समापन झाले. शांतिकुंज हरिद्वार येथील रमेश देहाडिया यांनी परिवार निर्माण, सुसंस्कारित समाजाचे निर्माण आदी विषयांवर कथेच्या माध्यमातून उद्बोधन केले. समाजातील अंधश्रद्धा व कुप्रथांवर प्रहार करीत वैभवसंपन्न परिवार निर्माण करण्याचे महत्त्व त्यांनी उदाहरणाद्वारे अधोरेखित केले. विद्यारंभ संस्कार, जन्मदिवस संस्कार, दीक्षा संस्कार, गर्भसंस्कार व गायत्री महायज्ञाद्वारे सोहळ्याचा समारोप झाला. प्रवीण भागवत, डॉ. अभय पाठक व प्रदीप मेश्राम यांनी सपत्नीक रमेश देहाडिया यांचा सत्कार केला. यावेळी नगरसेवक राजू नागुलवार, वासुदेव ठोके, नयना झाडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी गायत्री परिवारच्या सदस्यांनी सहकार्य केले.
साईमंदिराचा वर्धापनदिन सोहळा
नागपूर : श्री साईबाबा चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने बरडे लेआऊट, बोरगाव येथील साई मंदिराच्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता मिरवणूक निघणार आहे. पालखी बरडे लेआऊटमार्गे एकतानगर, हनुमान मंदिर, गोरेवाडा रोड, बोरगाव वस्ती, भूपेशनगरातून जाईल. साईमंदिरात पालखीचा समारोप होईल. रात्री ८ वाजता कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी ७ वाजता अभिषेक, दुपारी २ वाजता यज्ञ, रात्री ८ वाजता कीर्तन होईल. रविवारी रात्री कीर्तनकार उमेश बारापात्रे यांचे कीर्तन होईल. सोमवारी सायंकाळी ७ वाजता साईसंध्या भजन कार्यक्रम होईल. सोमवारी सायंकाळी ५ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

Web Title: Religion-spirituality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.