धर्म
By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:11+5:302015-02-13T00:38:11+5:30
प्रकट दिनानिमित्त टिमकीत पालखी मिरवणूक

धर्म
प रकट दिनानिमित्त टिमकीत पालखी मिरवणूकनागपूर : टिमकी, तीन खंबा चौक येथील श्री संत गजानन महाराज सेवा समितीच्या वतीने संत गजानन महाराजांचा १३७ वा प्रकटदिन उत्सवाला ४ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. शुक्रवार, १३ फेब्रुवारी रोजी श्रींची पालखी दुपारी ४ वाजता तीन खंबा चौकातून निघणार आहे. पालखी मिरवणुकीनंतर महाआरती होईल व संध्याकाळी महाप्रसाद वितरित होणार आहे, अशी माहिती समितीचे प्रचारप्रमुख श्याम गडवे यांनी दिली.