हरविलेला मुकबधीर तरुण नातेवाईकांच्या स्वाधीन

By Admin | Updated: October 31, 2015 22:45 IST2015-10-31T22:45:14+5:302015-10-31T22:45:14+5:30

रेल्वे सुरक्षा बलाचा पुढाकार : सुरतहून झाला होता बेपत्ता

Relieved of deceased young relatives | हरविलेला मुकबधीर तरुण नातेवाईकांच्या स्वाधीन

हरविलेला मुकबधीर तरुण नातेवाईकांच्या स्वाधीन

ल्वे सुरक्षा बलाचा पुढाकार : सुरतहून झाला होता बेपत्ता
जळगाव: सुरत येथून बेपत्ता झालेला विजय राजेश रावतोडे (वय २५, रा.विजय नगर, उधना सुरत) या तरुणास रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकार्‍यांनी शनिवारी त्याच्या नातेवाईकांचा शोध घेवून त्यांच्या ताब्यात दिले. विजय हरविल्याबाबत सुरत पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे. रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक एस.पी.यादव हे शनिवारी त्यांच्या सहकार्‍यांसह स्टेशनवर तपासणी करीत असताना साडे चार वाजता नवजीवन एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर आली. या गाडीची तपासणी केल्यानंतर गाडी पुढच्या मार्गाला रवाना झाली.त्यानंतर विजय हा संशयास्पद फिरत असल्याचे यादव यांच्या लक्षात आले. त्यांनी त्याला कार्यालयात आणले. त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याला बोलताही येत नव्हते व ऐकूही येत नव्हते. तो मूकबधीर असल्याचे लक्षात आल्यानंतर निरीक्षक गोकुळ सोनुने यांनी त्याच्याजवळ असलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन केला असता तो त्याच्या वडीलांचा निघाला. त्यांना विजयची माहिती दिल्यावर तो मूकबधीर असून आम्ही त्याचा गुजरातमध्ये शोध घेत असल्याचे सांगितले. त्यांनी धरणगाव येथील नातेवाईक संतोष अशोक सुतारे यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या ताब्यात देण्याची विनंती केली. सुतारे हे रात्री आठ वाजता जळगावात आल्यावर विजयला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.

Web Title: Relieved of deceased young relatives