तिस्ता सेटलवाड यांना १९ पर्यंत दिलासा

By Admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:16+5:302015-02-13T23:11:16+5:30

नवी दिल्ली: गुजरात दंगलीत बेचिराख झालेल्या गुलबर्ग सोसायटीच्या जागी संग्रहालय उभारण्यासाठी गोळा करण्यात आलेल्या निधीत अपहार केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना सर्वोच्च न्यायालयाने आज शुक्रवारी पुन्हा दिलासा दिला़ १९ फेबु्रवारीपर्यंत तिस्ता आणि त्यांच्या पतीला अटक करण्यात येऊ नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले़

Relief to Teesta Setalvad till 19th | तिस्ता सेटलवाड यांना १९ पर्यंत दिलासा

तिस्ता सेटलवाड यांना १९ पर्यंत दिलासा

ी दिल्ली: गुजरात दंगलीत बेचिराख झालेल्या गुलबर्ग सोसायटीच्या जागी संग्रहालय उभारण्यासाठी गोळा करण्यात आलेल्या निधीत अपहार केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना सर्वोच्च न्यायालयाने आज शुक्रवारी पुन्हा दिलासा दिला़ १९ फेबु्रवारीपर्यंत तिस्ता आणि त्यांच्या पतीला अटक करण्यात येऊ नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले़
आम्ही एफआयआर रद्द करणार नाही़ केवळ एफआयआरच्या आधारावर आम्ही या प्रकरणाची स्वतंत्रपणे पडताळणी करू आणि त्यानंतर तिस्ता आणि त्यांच्या पतीला अटकपूर्व जामीन देण्याबाबत निर्णय घेऊ, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्या़ एस़जे़ मुखोपाध्याय आणि न्या़ एऩव्ही़ रमण यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले़ सुमारे अर्ध्या तासाच्या सुनावणीनंतर न्यायालयाने संबंधित प्रकरणाची सुनावणी १९ फेबु्रवारीपर्यंत स्थगित केली़ तोपर्यंत काल गुरुवारी दिलेला अंतरिम संरक्षणाचा आदेश प्रभावी राहिल, असे न्यायालयाने सांगितले़ तसेच संबंधित पक्षांना गुजरात उच्च न्यायालयाचा निर्णय आणि अतिरिक्त दस्तऐवज सादर करण्याचे निर्देश दिले़
आरोपींकडून तपासात सहकार्य मिळत नसल्याने आणि सर्वांनी गुलबर्ग सोसायटीचा निधी खासगी कामांसाठी खर्च केल्याचे प्रथमदृष्ट्या दिसत असल्याचे नमूद करून काल गुरुवारी गुजरात उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. यानंतर अहमदाबाद पोलिसांनी सेटलवाड व त्यांच्या पतीचा शोध सुरू केला होता़ त्यांचा ठावठिकाणा जाणून घेण्यासाठी मुंबई पोलिसांची मदतही मागण्यात आली होती़ सेटलवाड व त्यांचे पती मंुबईतील जुहू भागात वास्तव्यास आहेत़
गुजरात दंगलीदरम्यान आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या गुलबर्ग सोसायटीत एक संग्रहालय उभारण्याच्या इराद्याने कोट्यवधी रुपयांचा निधी उभारण्यात आला होता़ गुजरात दंगल पीडितांना न्याय देण्यासाठी लढण्याचा दावा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी हा निधी हडप केल्याचा आरोप आहे़ सोसायटीच्या १२ लोकांनी तिस्ता व अन्य लोकांविरुद्ध सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी हडपल्याचा आरोप केला होता़ गतवर्षी जानेवारीत याप्रकरणी प्रकरण दाखल केले होते़ सेटलवाड यांचे पती, याशिवाय गुजरात दंगलीत मृत्युमुखी पडलेले काँग्रेस खासदार अहसान जाफरी यांचा मुलगा तनवीर जाफरी, गुलबर्ग सोसायटीचे निवासी फिरोज गुलजार हे याप्रकरणातील आरोपी आहे़

Web Title: Relief to Teesta Setalvad till 19th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.