श्रीनिवासन यांना दिलासा
By Admin | Updated: November 18, 2014 03:06 IST2014-11-18T03:06:59+5:302014-11-18T03:06:59+5:30
स्पॉट फिक्सिंगप्रकरणी न्यायमूर्ती मुद््गल समितीच्या अहवालात एन. श्रीनिवासन यांना फिक्सिंगमधून क्लीन चिट मिळाली असली तरी त्यांनी जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

श्रीनिवासन यांना दिलासा
नवी दिल्ली : स्पॉट फिक्सिंगप्रकरणी न्यायमूर्ती मुद््गल समितीच्या अहवालात एन. श्रीनिवासन यांना फिक्सिंगमधून क्लीन चिट मिळाली असली तरी त्यांनी जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. दुसरीकडे त्यांचा जावई गुरुनाथ मयप्पन, राजस्थान रॉयल्सचा सहमालक राज कुंद्रा व आयपीएलचा सीईओ सुंदर रमण यांचा फिक्सिंगमध्ये सहभाग असल्याचे अहवालात नमूद केले आहे.