सामान्य माणसाला दिलासा, पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त

By Admin | Updated: May 15, 2017 23:49 IST2017-05-15T23:39:47+5:302017-05-15T23:49:40+5:30

सामान्य माणसाला दिलासादायक वृत्त आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी सामान्य माणसांना दिलासा देताना पेट्रोल आणि डीझेलच्या किंमतींमध्ये कपात केल्याचं जाहीर केलं आहे.

Relief for the common man, petrol and diesel is cheap | सामान्य माणसाला दिलासा, पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त

सामान्य माणसाला दिलासा, पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 15 - सामान्य माणसाला दिलासादायक वृत्त आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी सामान्य माणसांना दिलासा देताना पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये कपात केल्याचं जाहीर केलं आहे. कच्च्या तेलाच्या किंमती उतरल्याने तेल कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे.

पेट्रोलच्या किंमतीत प्रती लीटर 2 रुपये 16 पैशांची कपात करण्यात आली आहे. तर डिझेलच्या किंमतीत प्रती लीटर  2 रुपये 10 पैशांनी स्वस्त झालं आहे. 

आज (दि.15) मध्यरात्री नव्या किंमती लागू होणार आहेत. यापुर्वी 1 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत किंचित वाढ करण्यात आली होती.  त्यावेळी पेट्रोलच्या किंमतीत 1 पैसा तर डिझेलच्या किंमतीत 44 पैशांची वाढ कऱण्यात आली होती. तर 16 एप्रिल रोजी  पेट्रोलच्या किंमतीत 1 रुपये 39 पैसे प्रती लीटर तर डिझेलच्या किंमतीत 1 रूपया 4 पैशांची वाढ झाली होती. 

Web Title: Relief for the common man, petrol and diesel is cheap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.