शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

Assam Floods: आसाममधील पुरात अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी अंबनींची २५ कोटींची मदत, मुख्यमत्र्यांनी मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 15:15 IST

Assam Floods: आसाममधील पुरात अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी मुकेश अंबानी आणि त्यांच्या मुलाने २५ कोटी रुपयांची मदत केली. त्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मुकेश अंबानी आणि अनंत अंबानी यांचे आभार मानले.

आसाममध्ये सतत सुरू असलेला पाऊस आणि पुरामुळे परिस्थिती गंभीर झाली असून सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या २४ मध्ये पुरामुळे १० लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर आसाममध्ये पूर आणि भूस्खलनामुळे झालेल्या मृतांचा आकडा ११७ वर पोहोचला आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील पुरामुळे बाधित झालेल्या लोकांच्या संख्येत घट झाली आहे. ताज्या अहवालानुसार आसाममधील २८ जिल्ह्यांतील ३३.०४ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे, तर शुक्रवारी ३० जिल्ह्यांतील ४५.३४ लाख लोक प्रभावित झाले आहेत. दरम्यान, मुकेश अंबानी आणि त्यांचा मुलगा अनंत अंबानी यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री मदत निधी (CMRF) मध्ये २५ कोटी रुपयांची मदत केली आहे.

यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी आणि त्यांचा मुलगा अनंत अंबानी यांचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी यासंदर्भात एक ट्वीट केले आहे. मुख्यमंत्री मदत निधीला २५ कोटी रुपयांची देणगी देऊन या कठीण प्रसंगी आसामच्या लोकांच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल मुकेश अंबानी आणि अनंत अंबानी यांचे मनःपूर्वक आभार, असं त्यांनी म्हटलं आहे.

अनेकांकडून मोठी मदतमीडिया रिपोर्ट्सनुसार, मुकेश अंबानी आणि अनंत अंबानींशिवाय इतर अनेक लोकांनीही मदत निधीसाठी मोठी रक्कम दिली आहे. दलाई लामा यांनी त्यांच्या ट्रस्टकडून १० लाख रुपयांची मदत केली आहे. त्याचवेळी ऑईल इंडिया लिमिटेडने ५ कोटी रुपये, टी-सीरीजचे मालक आणि निर्माते भूषण कुमार यांनी आसामच्या लोकांसाठी ११ लाख रुपयांची मदत केली आहे. यासोबतच प्रसिद्ध गायक सोनू निगम, बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि चित्रपट निर्माता रोहित शेट्टी यांनी मुख्यमंत्री मदत निधीला (CMRF) प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत केली आहे.

टॅग्स :AssamआसामMukesh Ambaniमुकेश अंबानी