लेह : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक व अन्य आंदोलकांची जोवर तुरुंगातून मुक्तता होणार नाही, तसेच लेहमधील मागील आठवड्यात झालेल्या पोलिस गोळीबार प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले जात नाहीत तोवर केंद्राशी चर्चा करणार नाही. या लेह अॅपेक्स बॉडीच्या (एलएबी) निर्णयाला कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सने (केडीए) पाठिंबा दर्शविला.लडाखला राज्याचा दर्जा द्या, अशी एलएबी व केडीए या दोन्ही संघटनांची मागणी आहे. आंदोलनात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेचा निषेध करून करबलै म्हणाले, काही जण लडाखच्या नागरिकांना देशद्रोही ठरवू पाहत आहेत.
देशद्रोही ठरविण्याचा कटसोनम वांगचूक व त्यांच्या संस्थांना देशद्रोही ठरविण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप त्यांची पत्नी व हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्हज् लडाख या संस्थेच्या सह-संस्थापक गीतांजली आंगमो यांनी मंगळवारी केला.
संचारबंदी शिथिल केली
लडाखमधील हिंसाग्रस्त लेह शहरात मंगळवारी सकाळी १० वाजेपासून ७तासांसाठी संचारबंदी शिथिल करण्यात आली. त्यावेळी नागरिकांची जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी दुकाने, बाजारपेठांमध्ये झुंबड उडाली.
केंद्र सरकारने लडाखच्या जनतेला फसविले : राहुल
१. केंद्र सरकारने लडाखच्या जनतेची फसवणूक केली आहे. त्या केंद्रशासित प्रदेशात पोलिस गोळीबारात चार आंदोलक मरण पावले. त्या घटनेची न्यायालयीन चौकशी होणे आवश्यक आहे, अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केली.२. लडाखमध्ये गोळीबारात मरण पावलेल्यांमध्ये माजी सैनिक त्सेवांग थारचिन यांचा समावेश आहे. त्सेवांग यांचे वडील लष्करात होते. मात्र, लडाखच्या हक्कांसाठी उभारलेल्या आंदोलनात सहभागी झाल्याने त्सेवांग थारचिन यांना मरण पत्करावे लागले. देशसेवेचे हेच फळ आहे का? असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला आहे.
Web Summary : Leh Apex Body (LAB) demands activist Sonam Wangchuk's release for talks with the Centre. KDA supports this stance. They seek Ladakh's statehood. Rahul Gandhi criticizes the government over the Ladakh issue, demanding a judicial inquiry into the police firing.
Web Summary : लेह एपेक्स बॉडी (एलएबी) ने केंद्र से बातचीत के लिए कार्यकर्ता सोनम वांगचुक की रिहाई की मांग की। केडीए का समर्थन। लद्दाख को राज्य का दर्जा देने की मांग। राहुल गांधी ने लद्दाख मुद्दे पर सरकार की आलोचना की और पुलिस फायरिंग की न्यायिक जांच की मांग की।