स्वमालकीच्या ठिकाणावर राजकीय पोस्टर्स लावण्याबाबतची याचिका फेटाळली
By Admin | Updated: February 20, 2015 01:10 IST2015-02-20T01:10:26+5:302015-02-20T01:10:26+5:30
नवी दिल्ली : सन २०१३ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पार्टीच्या समर्थकांच्या स्वमालकीच्या ठिकाणी लावण्यात आलेले पक्षाचे पोस्टर्स हटविण्याच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली़

स्वमालकीच्या ठिकाणावर राजकीय पोस्टर्स लावण्याबाबतची याचिका फेटाळली
न ी दिल्ली : सन २०१३ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पार्टीच्या समर्थकांच्या स्वमालकीच्या ठिकाणी लावण्यात आलेले पक्षाचे पोस्टर्स हटविण्याच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली़सन २०१३ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पार्टीच्या समर्थकांच्या स्वमालकीच्या ठिकाणी लावण्यात आलेले पक्षाचे पोस्टर्स हटवावे आदेश राज्य पोलिसांनी दिले होते़ असे न केल्यास दिल्ली संपत्ती विरुपता प्रतिबंधक कायदा २००७ अंतर्गत कायदेशीर कारवाईची धमकीही दिली होती़ अनिल भाटिया यांनी या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली होती़ तथापि न्या़ जी़ रोहिणी आणि न्या़ एस़ एंडलॉ यांच्या खंडपीठाने त्यांची ही याचिका फेटाळून लावली़ कायद्यानुसार संबंधित प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगीनेच पोस्टर्स लावता येऊ शकतील, असेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले़ स्वमालकीच्या ठिकाणी राजकीय पोस्टर्स लावण्यापासून रोखणे हे नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याविरुद्ध आहे आणि अशी बंदी तात्काळ संपुष्टात आणायला हवी, असे याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत म्हटले होते़