शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

"धंदा करने का है तो...."; #Reject_Zomoto का होतोय Twitter वर हॅशटॅग ट्रेंड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 10:51 IST

Zomato विरोधात सोशल मीडियावर युझर्सकडून एक मोहीम राबवली जात आहे. दरम्यान, #Reject_Zomato हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसत आहे. यापूर्वी महाराष्ट्रातही अनेकदा अशाप्रकारची मागणी झाली आहे आणि होतही आहे.

ठळक मुद्दे#Reject_Zomato हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसत आहे.यापूर्वी महाराष्ट्रातही अनेकदा अशाप्रकारची मागणी झाली आहे आणि होतही आहे.

Food Delivery अॅप Zomato पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. कंपनीच्या एका एक्झिक्युटिव्हसोबत कस्टमरच्या चॅटचा एक स्क्रिनशॉट सध्या व्हायरल होत आहे. तामिळनाडू मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीनं Zomato एक्झिक्युटिव्ह कडून आपल्याला हिंदी शिकण्यास सांगितल्याचा आरोप केला आहे. "कस्टमर केअरसंच असं म्हणणं आहे की मला हिंदी येत नसल्यामुळे आम्ही रिफंड करू शकत नाही. त्यांनी मी खोटा असल्याचंही म्हटलं. याशिवाय कर्मचाऱ्यानं हिदी ही आपली राष्ट्रभाषा असून सर्वांना ती थोडी तरी आली पाहिजी असं म्हटलं," असा आरोप विकास नावाच्या एका व्यक्तीनं स्क्रिनशॉट शेअर करत केला.

यानंतर अनेकांनी Zomato ला हिंदी ही आपली राष्ट्राभाषा आहे का असा प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. याविरोधात युझर्सनं आता सोशल मीडियावर एक मोहीम सुरू केली असून #Reject_Zomato हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. तसंच अनेकांनी Zomato नं यावर स्पष्टीकरण द्यावी अशी मागणीही केली आहे. काय आहे प्रकरण?#Reject_Zomato या ट्रेंडची सुरूवात विकास नावाच्या एका युझरपासून झाली. त्यांच्या ट्वीटनुसार त्यानं ऑर्डर केलेल्या पदार्थांपैकी एक पदार्थ त्याला मिळाला नव्हता. त्यानं अॅपवर यासंदर्भात कस्टमर केअरशी संवाद साधला. त्यावेळी त्यानं रिफंडची मागणी केली. दरम्यान, त्यानं शेअर केलेल्या स्क्रिनशॉटनुसार संबंधित कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हला तो ज्या भाषेत बोलत होता ते समजत नसल्याचं दिसून येत आहे. त्यावर विकासनं जर झोमॅटो तामिळनाडूमध्ये उपलब्ध आहे तर अशा व्यक्तींना त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे ज्यांना स्थानिक भाषेचं ज्ञान आहे, असं त्यानं म्हटलं. यावर उत्तर देताना एक्झिक्युटिव्हनं हिंदी आपली राष्ट्रभाषा असून सर्वांना थोडंफार हिंदी तर आलंच पाहिजे असा रिप्लाय दिला. यापूर्वीही अनेकदा झोमॅटो वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. 

यापूर्वी महाराष्ट्रातही मराठीसाठी आवाज उठवण्यात आला होता. दुकानांवरील पाट्या, एटीएममध्ये मराठी भाषेचा पर्याय किंवा ऑनलाईन अॅपमध्येही मराठीच्या पर्यायासाठी मागणी करण्यात आली होती. यापूर्वी मनसेनं Amazon वर मराठीचा पर्याय मिळावा अशी मागणी केली होती. त्यानंतर Amazon नं तात्काळ बदल करत खरेदीदार आणि विक्रेत्यांसाठी मराठीचा पर्याय उपलब्ध करून दिला होता.

टॅग्स :ZomatoझोमॅटोTwitterट्विटरSocial Mediaसोशल मीडिया