रेहमान यांनी घरवपासी केल्यास स्वागतच - योगी आदित्यनाथ
By Admin | Updated: September 20, 2015 09:46 IST2015-09-20T09:46:51+5:302015-09-20T09:46:51+5:30
ख्यातनाम संगीत ए आर रेहमान यांनी 'घरवापसी' केली तर त्यांचे स्वागतच आहे असे विधान भाजपा खासदार योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.

रेहमान यांनी घरवपासी केल्यास स्वागतच - योगी आदित्यनाथ
ऑनलाइन लोकमत
गोरखपूर, दि. २० - ख्यातनाम संगीत ए आर रेहमान यांनी 'घरवापसी' केली तर त्यांचे स्वागतच आहे असे विधान भाजपा खासदार योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. रेहमान यांची इच्छा असेल तरच त्यांची घरवापसी शक्य आहे असेही त्यांनी नमूद केले.
काही दिवसांपूर्वी मुंबईतील रझा अॅकेडमीने ए आर रेहमानविरोधात फतवा काढला होता. मोहम्मद द मेसेंजर ऑफ गॉड या इराणी चित्रपटाला संगीत दिल्याने हा फतवा काढण्यात आला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांनी ए आर रेहमानला घरवापसी अर्थात पुन्हा हिंदू धर्म स्वीकारण्यासाठी निमंत्रणच दिले आहे. रेहमान यांनी घरवापसी केली तर आम्ही त्यांचे खुल्या मनाने स्वागत करु असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. देशातील फतवा पद्धत बंद होण्याची गरज असून रेहमानविरोधात काढलेला फतवा हास्यास्पद प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ए आर रेहमान यांनी १९८९ मध्ये इस्लाम धर्म स्वीकारला होता.