माकडांसाठी पुनर्वसन केंद्र उभारणार
By Admin | Updated: February 5, 2016 11:43 IST2016-02-05T10:28:33+5:302016-02-05T11:43:18+5:30
माकाडांचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी तामिळनाडूच्या वन खात्याने राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये माकडांसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे.

माकडांसाठी पुनर्वसन केंद्र उभारणार
ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. ५ - माकाडांचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी तामिळनाडूच्या वन खात्याने राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये माकडांसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. माकडांच्या पुनर्वसनासाठी जागा आधीच निश्चित करण्यात आल्या आहेत.
माकडांना ठेवण्यासाठी पिंजरे उपलब्ध असून, अन्य आवश्यक साहित्य लवकरच विकत घेण्यात येईल असे वन खात्याच्या पत्रकात म्हटले आहे. वेळोवेळी करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये माकडांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे.
वाढणा-या संख्येमुळे माकडांकडून नागरीकांना होणारा उपद्रवही वाढला आहे त्यामुळे माकडांसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. माकडांची वाढती संख्या रोखण्यासाठी यापूर्वी केलेल्या सर्व उपायोजना अयशस्वी ठरल्या आहेत.