हैदराबाद विद्यापीठात नियमित वर्ग सुरू

By Admin | Updated: February 2, 2016 02:29 IST2016-02-02T02:29:07+5:302016-02-02T02:29:07+5:30

रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर गेल्या दोन आठवड्यांपासून आंदोलन, निदर्शनांनी ढवळून निघालेल्या हैदराबाद केंद्रीय विद्यापीठात सोमवारपासून नियमित

Regular classes are started in Hyderabad University | हैदराबाद विद्यापीठात नियमित वर्ग सुरू

हैदराबाद विद्यापीठात नियमित वर्ग सुरू

हैदराबाद : रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर गेल्या दोन आठवड्यांपासून आंदोलन, निदर्शनांनी ढवळून निघालेल्या हैदराबाद केंद्रीय विद्यापीठात सोमवारपासून नियमित वर्ग आणि प्रशासकीय कामकाज पूर्ववत सुरू झाले.
आंदोलनकर्त्या संयुक्त कृती समितीचे प्रवक्ता डिकेन्स यांनी ही माहिती दिली. नियमित वर्ग सुरू झाले आहेत. प्रशासकीय कामकाजही सुरू झाले आहे. आम्ही १० दिवसांची मुदत निश्चित केली आहे. आम्ही साखळी उपोषण, शांततापूर्ण मोर्चा अशा माध्यमातून आंदोलन सुरूठेवू. कुलगुरूअप्पा राव यांना हटविण्याच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत.

Web Title: Regular classes are started in Hyderabad University