आधार कार्डची नोंदणी नि:शुल्क
By Admin | Updated: February 20, 2015 01:10 IST2015-02-20T01:10:39+5:302015-02-20T01:10:39+5:30
नागपूर: शासनाच्या महा-ई सेवा केंद्रात सुरू असलेली आधार नोंदणी नि:शुल्क असून त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही, असे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात तसेच ग्रामीण भागात तहसील कार्यालय किंवा तत्सम ठिकाणी आधार कार्ड काढून देण्यासाठी रकमेची मागणी केली जाते, अशा तक्रारी आहेत. त्याची दखल घेत महा-ई सेवा केंद्रात नागरिकांसाठी फलकही लावण्यात आले असून त्यावर नोंदणी नि:शुल्क असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यासोबतच शुल्क आकारण्यात येणाऱ्या ई-आधार, डेमोग्राफिक अपडेशन आणि बायोमेट्रिक अपडेशनचे दरही देण्यात आले आहे. त्यानुसारच नागरिकांनी पैसे द्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

आधार कार्डची नोंदणी नि:शुल्क
न गपूर: शासनाच्या महा-ई सेवा केंद्रात सुरू असलेली आधार नोंदणी नि:शुल्क असून त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही, असे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात तसेच ग्रामीण भागात तहसील कार्यालय किंवा तत्सम ठिकाणी आधार कार्ड काढून देण्यासाठी रकमेची मागणी केली जाते, अशा तक्रारी आहेत. त्याची दखल घेत महा-ई सेवा केंद्रात नागरिकांसाठी फलकही लावण्यात आले असून त्यावर नोंदणी नि:शुल्क असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यासोबतच शुल्क आकारण्यात येणाऱ्या ई-आधार, डेमोग्राफिक अपडेशन आणि बायोमेट्रिक अपडेशनचे दरही देण्यात आले आहे. त्यानुसारच नागरिकांनी पैसे द्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)