७ रोजी क्षेत्रसभा
By Admin | Updated: April 5, 2016 00:14 IST2016-04-05T00:14:01+5:302016-04-05T00:14:01+5:30
जळगाव : शहरातील प्रभाग क्रमांक चारमध्ये ७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता क्षेत्रसभेचे आयोजन करण्यात आले आहे. एस.एम.आय.टी. महाविद्यालयाजवळील दुर्वांकूर पार्क येथे ही सभा होणार आहे. यासाठी सदस्य संदेश भोईटे व सदस्या दीपाली पाटील यांनी पत्र दिले होते. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.

७ रोजी क्षेत्रसभा
ज गाव : शहरातील प्रभाग क्रमांक चारमध्ये ७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता क्षेत्रसभेचे आयोजन करण्यात आले आहे. एस.एम.आय.टी. महाविद्यालयाजवळील दुर्वांकूर पार्क येथे ही सभा होणार आहे. यासाठी सदस्य संदेश भोईटे व सदस्या दीपाली पाटील यांनी पत्र दिले होते. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे. श्री अम्मा भगवान यांचा सामूहिक ऐश्वर्य कलश पूजनजळगाव : श्री अम्मा भगवान सेवक परिवारातर्फे शहरात चैत्र शुद्ध गुढीपाडवा, नवीन वर्षाला प्रथमच १०८ कलशांचे सामूहिक पूजन होणार आहे. ८ रोजी दुपारी दोन ते तीन या वेळेत मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे हा कार्यक्रम होणार असून श्री अम्मा भगवान यांचे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे दर्शन होणार आहे. लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दर्जी फाउंडेशनच्या सागर भुतेचे पोस्ट ऑफिस परीक्षेत यशजळगाव : मुक्ताईर्नगर तालुक्यातील कुर्हा येथील रहिवासी व दर्जी फाउंडेशनचा विद्यार्थी सागर भुते याने पोस्ट ऑफिस परीक्षेत यश मिळवित त्याची एम.टी.आय. पदी निवड झाली. दुष्काळग्रस्त व आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या मुलांसाठी दर्जी फाउंडेशनच्यावतीने स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण सुरू असलेल्या वर्गात त्याने सहभाग नोंदविला होता. फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा म्हणून १९९८ पासून चळवळ सुरू आहे. येत्या काळात असे अनेक सागर फाउंडेशनच्या माध्यामातून द्यायचे आहे, असे संचालिका ज्योती दर्जी यांनी सांगितले. सांधे प्रत्यारोपण तपासणी शिबिरजळगाव : ऑर्किड शॅल्बी व रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलतर्फे १० एप्रिल रोजी सकाळी ९.३० ते दुपारी तीन वाजेपर्यंत सांधे प्रत्यारोपण तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लाभ घेण्याचे आवाहन क्लबचे अध्यक्ष संतोष अग्रवाल, सचिव रोशन पगारिया, प्रकल्प पगारिया, कल्पेश दोशी, विष्णू भंगाळे, सुशील राका व सदस्यांनी केले आहे.