१३५ ठरावाबाबत शासनच बुचकळ्यात मनपा : वर्ष उलटला तरही घेतला नाही निर्णय

By Admin | Updated: November 7, 2015 22:27 IST2015-11-07T22:27:57+5:302015-11-07T22:27:57+5:30

जळगाव : मनपाच्या गाळे करारासंदर्भात झालेल्या १३५ क्रमांकाच्या ठरावाबाबत शासनच बुचकळ्यात पडले आहे. हा ठराव करून तब्बल एक वर्ष होऊनही त्यावर आतापर्यंत फक्त तारीख पे तारीख चालली आहे. शासनाने सूचित केल्याप्रमाणे मनपा प्रशासनाने केवळ अहवाल देण्याशिवाय वर्षभरात काहीही केलेले नाही. त्यामुळे शहराचा विकास होणे मुश्कील झाले आहे.

Regarding the 135rd resolution, the governor of Bukchalka: The decision has not taken even a year | १३५ ठरावाबाबत शासनच बुचकळ्यात मनपा : वर्ष उलटला तरही घेतला नाही निर्णय

१३५ ठरावाबाबत शासनच बुचकळ्यात मनपा : वर्ष उलटला तरही घेतला नाही निर्णय

गाव : मनपाच्या गाळे करारासंदर्भात झालेल्या १३५ क्रमांकाच्या ठरावाबाबत शासनच बुचकळ्यात पडले आहे. हा ठराव करून तब्बल एक वर्ष होऊनही त्यावर आतापर्यंत फक्त तारीख पे तारीख चालली आहे. शासनाने सूचित केल्याप्रमाणे मनपा प्रशासनाने केवळ अहवाल देण्याशिवाय वर्षभरात काहीही केलेले नाही. त्यामुळे शहराचा विकास होणे मुश्कील झाले आहे.
शहरातील १८ व्यापारी संकुलातील २,१७५ गाळे कराराची तीन वर्षांपूर्वीच मुदत संपली होती. पुन्हा नव्याने मनपाचे गाळे भाडेत्त्वावर देण्यासाठी मनपा प्रशासनाने नियोजन केले होते. त्यातूनच १३५ क्रमांकाचा ठराव तयार करण्यात आला होता. हे गाळे पुढील ३० वर्ष २०१४ च्या रेडिरेकनर दरानुसार ८ टक्के देण्याचे २० ऑक्टोबर २०१४ रोजी निर्णय झाला होता. तसा प्रस्ताव मंजुरीसाठी नगरविकास खात्याकडे पाठविण्यात आला होता. मात्र, याबाबत निर्णय झालेला नाही. या ठरावाला शासनस्तरावरून मंजुरी मिळाली तर महापालिकेवर असलेले कर्जाचे डोंगर फेडता येणार आहे. मात्र, शासनस्तरावर या ठरावाची फाईल इकडून तिकडे व तिकडून इकडे अशी फिरत असून या प्रक्रियेला आता महापालिकेतील अधिकारीही कंटाळले आहेत. शहरातील पाच लाख जनतेचा विचार करून लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून १३५ ठराव तत्काळ मार्गी लावणे आवश्यक असल्याचा सूर आता नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Web Title: Regarding the 135rd resolution, the governor of Bukchalka: The decision has not taken even a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.