शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
4
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
5
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
6
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
7
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
8
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
9
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
10
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
11
शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS
12
Navratri 2025: अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीला आवाहन आणि दशमीला पूजन; ३ दिवसांचा शारदोत्सव का?
13
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
14
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
15
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
16
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
17
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
18
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
19
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
20
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...

संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 15:28 IST

Rajnath Singh : शांघाई सहकार्य परिषदेच्या संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार देत राजनाथ सिंह यांनी चीन आणि पाकिस्तानचा एक कुटील डाव हाणून पाडला. राजनाथ सिंह यांनी घेतलेल्या कणखर भूमिकेची इनसाईड स्टोरी आता समोर येत आहे. 

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा शांघाई सहकार्य संघटनेच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी केलेला चीन दौरा चांगलाच चर्चेत आहे. या परिषदेमध्ये राजनाथ सिंह यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानचं जागतिक मंचावर पुरतं वस्त्रहरण केलं. तसेच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतानाच ऑपरेशन सिंदूरसारख्या मोहिमा भविष्यातही राबवण्याचा इशारा दिला. याचवेळी शांघाई सहकार्य परिषदेच्या संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार देत राजनाथ सिंह यांनी चीन आणि पाकिस्तानचा एक कुटील डाव हाणून पाडला. राजनाथ सिंह यांनी घेतलेल्या कणखर भूमिकेची इनसाईड स्टोरी आता समोर येत आहे. 

याबाबत मिळालेल्या अदिक माहितीनुसार भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्यासमोरच पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद, पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवरून भारताची भूमिका स्पष्ट करत पाकिस्तानची पुरती नाचक्की केली. त्यानंतर राजनाथ सिंह यांनी या परिषदेच्या संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. या निवेदनाच्या माध्यमातून भारताची कोंडी करण्याचा डाव चीन आणि पाकिस्तानने आखला होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शांघाई सहकार्य परिषदेच्या संयुक्त निवेदनामध्ये पाकिस्तान दहशतवादाच्या संदर्भात बलुचिस्तानचाही समावेश करण्याच्या प्रयत्नात होता. त्या माध्यमातून भारताची कोंडी करण्याचा कुटील डाव होता. तसेच त्याला चीनचाही पाठिंबा होता.  बलुचिस्तानमध्ये निर्माण झालेल्या स्वातंत्र्याच्या लढाईला भारताची चिथावणी असल्याचा आरोप पाकिस्तान करून सातत्याने करण्यात येतो. त्यामुळेच बलुचिस्तानआडून भारताला बदनाम करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता.

भारताचे संरक्षणमंत्री असलेल्या राजनाथ सिंह यांना ही बाब अमान्य होती. त्यांनी या संयुक्त निवेदनाच्या मसुद्यावर सही करण्यास नकार दिला. त्याशिवाय या मसुद्यामध्ये पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करण्याची आग्रही भूमिका भारताने घेतली होती. मात्र त्याला पाकिस्तानने आक्षेप घेतला होता. त्यामुळे अखेरीस शांघाई सहकारी परिषदेच्या बैठकीनंतर संयुक्त निवेदन प्रसिद्ध होऊ शकलं नाही.  

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहIndiaभारतPakistanपाकिस्तानchinaचीन