प्रेमास नकार दिल्याने महिलेने डॉक्टरवर फेकले अॅसिड

By Admin | Updated: May 17, 2016 15:03 IST2016-05-17T15:03:40+5:302016-05-17T15:03:41+5:30

प्रेमाचा प्रस्ताव नाकारला म्हणून एका ४५ वर्षीय महिलेने २८ वर्षाच्या पशूवैद्यकीय डॉक्टरवर अॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना गाझियाबादमध्ये घडली.

By refusing love, the woman threw acid on the doctor | प्रेमास नकार दिल्याने महिलेने डॉक्टरवर फेकले अॅसिड

प्रेमास नकार दिल्याने महिलेने डॉक्टरवर फेकले अॅसिड

 ऑनलाइन लोकमत 

गाझियाबाद, दि. १७ - प्रेमाचा प्रस्ताव नाकारला म्हणून एका ४५ वर्षीय महिलेने २८ वर्षाच्या पशूवैद्यकीय डॉक्टरवर अॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉ. अमित वर्मा असे या पिडीत डॉक्टरचे नाव आहे. उत्तरप्रदेशच्या गाझियाबाद शहरातील वैशाली भागामध्ये सोमवारी सकाळी ही घटना घडली. 
गेल्या अठरा दिवसांपासून ही महिला डॉक्टर अमितचा पाठलाग करुन त्याच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत होती. पण अमितने तिचा प्रस्ताव धुडकावून लावला होता. सेक्टर ४ मधील डॉग क्लिनिकमध्ये अमित वर्मा पशूवैद्यकीय डॉक्टर म्हणून काम करतात. डॉ. अमितचे सहकारी दीपक यांनी दिलेल्या माहितीनुसार अमित क्लिनिकच्या बाजूच्या रुममध्ये रहातात. 
सोमवारी सकाळी ही महिला सकाळी थेट घरात घुसली व तिने अमितवर अॅसिड फेकले यावेळी दीपक आंघोळ करत होते. अमितला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. डॉ. अमित यांचा चेहरा आणि छाती चाळीस टक्के भाजली आहे. मागच्या महिन्यात २६ एप्रिलला ते क्लिनकमध्ये जॉईन झाले होते. 
डॉ. अमित वर्मा वैशालीला येण्यापूर्वी मेरठ इथे नोकरी करत होते. तिथे ज्या भाडयाच्या घरात तो रहात होता. तिथे अमितची हल्लेखोर घरमालकीणीबरोबर ओळख झाली होती. तिथे दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. अमित मेरठ सोडून गाझियाबादमध्ये आल्यानंतर दोघांमध्ये फारसे चांगले संबंध नव्हते. 
मागच्या अठरा दिवसात त्या महिलेने अमितची तीन वेळा भेट घेतली होती. पोलिसांनी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करुन तिचा शोध सुरु केला आहे. 

Web Title: By refusing love, the woman threw acid on the doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.