वर काळे असल्याने वधूंचा ऐनवेळेस लग्नाला नकार
By Admin | Updated: April 22, 2016 10:48 IST2016-04-22T10:44:50+5:302016-04-22T10:48:10+5:30
होणारा पती काळा असल्याचे कारण देत दोन बहिणींनी लग्न मोडल्याची धक्कादायक घटना फतेहाबाद येथील सिक्ररा गावात घडली.

वर काळे असल्याने वधूंचा ऐनवेळेस लग्नाला नकार
>ऑनलाइन लोकमत
आग्रा, दि. २२ - लग्नात हुंडा मागितला म्हणून वा सासरी शौचालय नाही या कारणांवरून मुलींनी लग्न करण्यास नकार दिल्याच्या घटना आपण आत्तापर्यंत ऐकल्या आहेत. मात्र होणारा पती काळा असल्याचे कारण देत दोन बहिणींनी लग्न मोडल्याची धक्कादायक घटना फतेहाबाद येथील सिक्ररा गावात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ऐन लग्नाच्या वेळेसच हा प्रकार घडला. ' एका बाबांच्या सांगण्यावरून या महिलेने आपल्या दोन मुलींचे लग्न ठरवले होते, मात्र त्या मुली आपल्या होणा-या नव-याला प्रत्यक्षात कधीच भेटल्या नव्हत्या, त्यांनी केवळ त्यांचे फोटोच पाहिले होते. बुधवारी लग्नाची घटिका समीप आलेली असताना त्या दोघींनी अचानक लग्न करण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या व-हाडींनी त्यांना लग्न मोडण्याचे कारण विचारले असता, आपले होणारे पती हे प्रत्यक्षात खूप काळे आणि वयाने बरेच मोठे दिसतात' असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. सर्व कुटुंबियांनी समजावूनही त्या दोघी तरूणी त्यांच्या दबावाला बळी न पडता आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने लग्नासाठी आलेले व-हाड व दोन्ही वर हे वधूंशिवायच घरी परतले.