शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

पदाेन्नतीत आरक्षणासाठी मापदंड ठरविण्यास नकार, डेटाची जबाबदारी राज्याची

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 10:43 IST

डेटाची जबाबदारी राज्याची : सुप्रीम कोर्ट

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सरकारी नाेकऱ्यांमध्ये पदाेन्नतीत अनुसूचित जाती आणि जमातींना आरक्षण देण्यासाठी काेणतेही मापदंड ठरविण्यास सर्वाेच्च न्यायालयाने नकार दिला. आरक्षण देण्यासाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या प्रतिनिधित्त्वाची आकडेवारी गाेळा करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे, असे सर्वाेच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

न्या. नागेश्वर राव, न्या. संजीव खन्ना आणि न्या. बी. आर. गवई यांच्या खंडपीठासमाेर याप्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने म्हटले, की पदोन्नतीतील आरक्षण लागू करण्यासाठी सरकारने माहिती जमा करून त्यानुसार निर्णय घ्यावा. ही माहिती गोळा करताना पदांच्या श्रेणीनुसार प्रतिनिधित्व निश्चित करावे. प्रतिनिधित्त्वासंबंधी आकडेवारी संपूर्ण सेवेच्या संबंधी असल्यास पदाेन्नतीशी संबंधित पदांसाठी प्रभावी आकडेवारी गाेळा करणारे कॅडर निरर्थक हाेईल, असे निरीक्षणही न्यायालयाने नाेंदविले. प्रतिनिधित्त्वाचे मूल्यमापन निर्धारित कालावधीत करायला हवे. तसेच हा कालावधी केंद्र सरकारने निश्चित करावा, असेही न्यायालयाने म्हटले आहे. आता पुढील सुनावणी २४ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

ठाेस आधार द्याn याप्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाने २६ ऑक्टाेबर २०२१ राेजी निकाल राखून ठेवला हाेता. n कोर्टाने एससी, एसटी आणि ओबीसीतील रिक्त पदे भरण्यासाठी काही ठोस आधार वा मापदंड ठरवावे, अशी मागणी ॲटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी यापूर्वी केली होती. n वेणुगाेपाल यांनी १९९२च्या मंडल आयाेग प्रकरणापासून २०१८च्या जरनैलसिंग प्रकरणाचे दाखले दिले.

काय आहे प्रकरण?तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी २००४मध्ये पदोन्नतीत आरक्षणाची तरतूद असलेला कायदा केला. त्यानंतर १३ वर्ष याची अंमलबजावणी सुरू राहिली. 

२०१७ मध्ये मुंबई हायकोर्टाने आरक्षणाबाबतच्या एका याचिकेवर ३३ टक्के आरक्षण अवैध ठरवले. त्यानंतर ७ मे २०२१ रोजी सरकारने पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करून सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीचा निर्णय घेतला. त्याविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागण्यात आली होती.

‘ताे’ निर्णय रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार

अनूसूचित जाती जमातीच्या सदस्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण द्यावे या माझ्या भूमिकेवर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. पदोन्नतीत आरक्षण ही संकल्पना न्यायालयाने मान्य केली आहे. तरीसुद्धा दि. ७ मे २०२१ चा शासन निर्णय काढून या पदोन्नतीला खोडा घालण्यात आला होता. ताे रद्द करावा यासाठी पाठपुरावा करणार आहे.    - डॉ. नितीन राऊत, ऊर्जा मंत्री 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMumbaiमुंबईreservationआरक्षण