शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमधील सहा मतदान केंद्रांवर फेरमतदानाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2017 08:49 IST

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आज सहा मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्यात येत आहे. या काही तांत्रिक कारणास्तव येथे फेरमतदान घेण्यात येत असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे.

अहमदाबाद -  गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आज सहा मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्यात येत आहे. या काही तांत्रिक कारणास्तव येथे फेरमतदान घेण्यात येत असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे. वडगाम, वीरामगाम, दस्करोई आणि सावली मतदार संघातील सहा मतदान केंद्रांवर हे फेरमतदान घेण्यात येत आहे.    या सहा मतदान केंद्रांवर मतदानापूर्वी मतदान यंत्र्यांच्या तपासणीसाठी घेण्यात आलेल्या प्रायोगिक मतदानाचा डेटा हटवण्यास  निवडणूक अधिकारी विसरले होते. त्यामुळे हे फेरमतदान घेण्यात येत आहे. वडगाम विधानसभा मतदार संघातील छानिया-1 आणि छानिया -2,  विरामगाम विधानसभा मतदारसंघातील बुथ क्र.27, दस्करोई मतदारसंघातील नारोदा, सावली मतदारसंघाती नहारा -1 आणि सकारदा-7 या ठिकाणी पुन्हा मतदान घेण्यात येत आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी 9 आणि 14 डिसेंबर रोजी दोन टप्प्यांमध्ये मतदान झाले होते. येत्या 18 डिसेंबरला गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ८९ मतदारसंघांत गेल्या शनिवारी ६८ टक्के मतदान झाले  होते.  याआधी २0१२ च्या निवडणुकीत ७0.७४ टक्के मतदान झाले होते. मात्र सुरुवातीच्या काही तासांतच मतदान यंत्रांबाबत अनेक तक्रारी आल्या. काही ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड, तर काही ठिकाणी छेडछाडीच्या तक्रारी मतदारांनी केल्या. अशा शंभरहून अधिक तक्रारी आल्या. तर 14 डिसेंबरला झालेल्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानामध्ये एकूण 68.70 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. गुजरातमधील शेवटच्या टप्प्यातील मतदान गुरुवारी संपताच विविध वृत्तवाहिन्यांच्या मतदानोत्तर सर्वेक्षणांचे (एक्झिट पोल) अंदाज आले  होते. त्यापैकी बहुतेक सर्वच एक्झिट पोलमधून गुजरातेत भाजपाच पुन्हा एकवार मोठ्या बहुमताने सत्तेवर येईल, असे एकमत दिसून आले. गुजरातमधील दुसऱ्या टप्प्यातील संपताच गुजरात आणि हिमाचल प्रदेश या  राज्यांमध्ये घेतलेल्या एक्झिट पोलचे निष्कर्ष वृत्तवाहिन्यांनी जाहीर केले. त्यांच्या निष्कर्षात भाजपा व काँग्रेस या दोन पक्षांना मिळू शकणा-या जागांबाबत एकमत नसले, तरी गुजरातमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता येईल आणि हिमाचल प्रदेशात सत्तांतर होऊन आणखी एक काँग्रेसशासित राज्य भाजपाच्या झोळीत जाईल, यावर या सर्वांमध्ये एकवाक्यता आहे. 

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017ElectionनिवडणूकGujaratगुजरात