गुगल मॅप्सने चुकीच्या ठिकाणी पोहोचल्यामुळे राजस्थानमध्ये झालेल्या REET परीक्षेसाठी अनेक कँडिडेट बसू शकले नाहीत. अशीच एक घटना आता समोर आली आहे. गुगल मॅपमुळे अलवर येथील बाबू शोभाराम कला महाविद्यालयाच्या गेटवर एक महिला कँडिडेट उशीरा पोहोचली. उशीरा पोहोचल्यामुळे महिलेला आत प्रवेश मिळाला नाही तेव्हा ती ढसाढसा रडू लागली. महिला कँडिडेट म्हणते की, ती ४ वर्षांपासून REET परीक्षेची तयारी करत आहे. परीक्षेच्या दिवशी उशीर झाल्यामुळे ती परीक्षेला बसू शकली नाही.
राजस्थान शिक्षक पात्रता परीक्षेच्या (REET) पहिल्या दिवशीच गोंधळ पाहायला मिळाला. परीक्षेला बसणाऱ्या कँडिडेट्सची मोठी रांग होती. कँडिडेट्सना बायोमेट्रिक मशीनद्वारे प्रवेश देण्यात आला. कँडिडेट एक मिनिट किंवा काही सेकंद उशीरा आले तरी त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जात नव्हता. अलवर येथील बाबू शोभाराम कला महाविद्यालयाच्या गेटवर कँडिडेट चिंतेत असल्याचं दिसून आलं. परीक्षेपासून वंचित राहिलेल्या कँडिडेट्सनी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सांगितलं की ते गुगल मॅप्सद्वारे परीक्षा केंद्रावर जात होते परंतु चुकीच्या गेटवर पोहोचल्यामुळे त्यांना परीक्षेपासून वंचित राहावं लागलं.
यावेळी परीक्षा केंद्राबाहेर कँडिडेट्सच्या डोळ्यातून अश्रू येत असल्याचं दिसून आलं. परीक्षा केंद्रावरील अनेक कँडिडेट्सनी सांगितलं की, जेव्हा ते फिरून कॉलेजच्या गेटवर पोहोचले तेव्हा त्यांना कॉलेजमध्ये प्रवेश दिला गेला नाही. उत्तर प्रदेशातील उमेदवार सपनाने रडत रडत सांगितलं, की ती चार वर्षांपासून या परीक्षेची तयारी करत होती पण गुगल मॅप्समुळे परीक्षा चुकली. वेळेवर पोहोचलो पण योग्य गेटवर पोहोचू शकलो नाही.
राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये अशीच परिस्थिती दिसून आली. काही ठिकाणी, तरुण त्यांच्या डॉक्यूमेंट्सचे झेरॉक्स काढण्यासाठी इकडे तिकडे भटकताना दिसले. पहिल्यांदाच बायोमेट्रिक आणि फेस स्कॅनिंग प्रणाली वापरून तपासणी करण्यात आली. सर्व परीक्षा केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.