शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

प्रसूती रजेच्या कायद्यामुळे महिलांच्या नोकऱ्यांत घट, देशातल्या १0 मोठ्या क्षेत्रात सर्वेक्षण केले  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 05:59 IST

प्रसुती काळासाठी २६ सप्ताहाच्या सुटीचा कायदा अमलात आल्यानंतर, देशात महिलांच्या नोकºयांमधे ११ ते १८ लाखांपर्यंत घट झाल्याचा धक्कादायक निष्कर्ष टीमलीजच्या सर्वेक्षणातून सामोर आला आहे.

नवी दिल्ली : प्रसुती काळासाठी २६ सप्ताहाच्या सुटीचा कायदा अमलात आल्यानंतर, देशात महिलांच्या नोकºयांमधे ११ ते १८ लाखांपर्यंत घट झाल्याचा धक्कादायक निष्कर्ष टीमलीजच्या सर्वेक्षणातून सामोर आला आहे.टीमलीजने देशातल्या १0 मोठ्या क्षेत्रात सर्वेक्षण केले. त्यानुसार, महानगरातील मोठ्या कंपन्यांमध्ये महिलांच्या नोकºयांवर प्रस्तुत कायद्याचा फारसा प्रभाव पडलेला नाही, मात्र छोट्या शहरांमध्ये लघु व मध्यम स्वरुपाच्या उद्योगांत महिलांना नोकºया मिळणे दुरापास्त झाले आहे. विशेषत: बीपीओ उद्योगांमध्ये त्याचा थेट प्रभाव जाणवतो आहे.संसदेत महिलांना प्रसुती काळात हक्काची रजा देणारा कायदा मंजूर झाल्यानंतर पुरुषांनाही या काळात अनेक अतिरिक्त जबाबदाºया सांभाळाव्या लागत असल्याने महिलांच्या प्रसुती काळात पुरुषांच्या हक्काच्या रजेतही वाढ करणारा कायदा करावा, अशी मागणी काही राजकीय पक्ष व संघटनांनी केली होती. काँग्रेसचे महाराष्ट्रातील खासदार राजीव सातव यांनी लोकसभेत या आशयाचे खाजगी विधेयकही मांडले होते.महिलांसाठी आवश्यक व उपयुक्त ठरणाºया प्रस्तुत कायद्याने महिलांचे नुकसान तर झाले नाही? महिलांना नोकरी देतांना खाजगी कंपन्यांनी हात तर आखडते घेतले नाहीत? महिलांच्या व्यावसायिक करिअरमधे हा कायदा मोठा अडथळा तर ठरणार नाही? संसदेतल्या अनेक खासदारांनी या मूलभूत प्रश्नांबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर सरकारने या विषयाचे नव्याने सर्वेक्षण करण्याचे ठरवले आहे. महिला रोजगार क्षेत्रातल्या या महत्वपूर्ण सर्वेक्षणाची जबाबदारी सरकारने केंद्रीय श्रम मंत्रालयाकडे सोपवली आहे. वर्ष अखेरपर्यंत याचा अहवाल प्राप्त झाला तर संसदेच्या हिवाळी अधिवेशनात त्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. यावेळी आवश्यकता भासल्यास महिलांना कायदेशीर सुरक्षा कवच पुरवण्याची मागणीही केली जाईल.काय आहे कायदा?मोदी सरकारने गेल्याच वर्षी महिलांना प्रसूती काळाची सुट्टी (ंमॅटर्निटी लिव्ह) साठी १२ सप्ताहांऐवजी २६ सप्ताहांची हक्काची रजा मिळवून देणारा कायदा मंजूर केला. या २६ सप्ताहात महिलांना पूर्ण पगार देण्याचीही तरतूद केली.

टॅग्स :Employeeकर्मचारीWomenमहिलाnewsबातम्या