एवेनेझर स्कुलमध्ये रिडराईिथक उपक्रम
By Admin | Updated: October 6, 2016 00:24 IST2016-10-05T23:58:28+5:302016-10-06T00:24:30+5:30
नाशिक : एवेनेझर इंटरनॅशनल स्कूलने रिडराईटथिंक या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना संपूर्ण आठवडाभर वेगवेगळ्या विषयाची व लेखकाची पुस्तके वाचायला दिलीत. त्यांना त्यातील पात्र व गोष्टीचा मर्म काय आहे याबद्दल शिक्षिकांनी प्रथम माहिती दिली. नंतर विद्यार्थी स्वत: आपले आवडत्या पात्राची वेशभूषा करुन आले व त्या पात्राविषयी स्पष्टीकरण दिले.

वाचन जीवनात किती महत्त्वाचे आहे व त्याचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर व शिक्षणावर कसा परिणाम होतो याबद्दल विनीता राबर्टस यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच सौ. झाबिया कापसी यांनी सर्व वर्गांना भेट देऊन विद्यार्थ्यांना लोककथा ऐकविल्या.
विद्यार्थ्याकरिता पुस्तकांचे मुखपृष्ठ बनविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये विद्यार्थ्यांना स्वत: एखाद्या पुस्तकाचे मुखपृष्ठ स्वत:च्या कल्पनेप्रमाणे बनावायचे होते. सिम्पसन प्रायमरी स्कूल स्कॉटलॅण्ड येथील विद्यार्थी व एबेनेझर च्या विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे पुस्तकांचे मुखपृष्ठ बनविले. (वा.प्र.)