कॉम्रेडला लाल सलाम आदर्श नेता गमावला : मान्यवरांनी व्यक्त केली शोकसंवेदना
By Admin | Updated: January 3, 2016 00:05 IST2016-01-03T00:05:04+5:302016-01-03T00:05:04+5:30
नागपूर : कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ. भाई बर्धन यांच्या निधनाने देशाने कामगारांसाठी आयुष्यभर लढणारा एक आदर्श नेता गमावला आहे. त्यांनी तत्त्वाशी कधी तडजोड केली नाही. बर्धन हे राजकारणापलिकडील प्रामाणिक व आदर्शवादी नेते होते. त्यांची उणीव देशाला सदैव जाणवेल, अशा शब्दात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त केली.

कॉम्रेडला लाल सलाम आदर्श नेता गमावला : मान्यवरांनी व्यक्त केली शोकसंवेदना
न गपूर : कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ. भाई बर्धन यांच्या निधनाने देशाने कामगारांसाठी आयुष्यभर लढणारा एक आदर्श नेता गमावला आहे. त्यांनी तत्त्वाशी कधी तडजोड केली नाही. बर्धन हे राजकारणापलिकडील प्रामाणिक व आदर्शवादी नेते होते. त्यांची उणीव देशाला सदैव जाणवेल, अशा शब्दात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त केली. नागपूरच्या भूषणाला गमावले- ए. बी. बर्धन यांच्या निधनामुळे कम्युनिस्ट पक्षाची मोठी हानी झाली. या पक्षाच्या मोठ्या पदापर्यंत पोहोचून त्यांनी नागपूरचे वैभव वाढविले. देशाच्या राजधानीत महाराष्ट्राच्या उपराजधानीचा गौरव वाढविला. त्यांच्या निधनाने भारतीय राजकाणाची भरून न निघणारी हानी झाली आहे. - चंद्रशेखर बावनकुळे,पालकमंत्री, नागपूर जिल्हानागपूरचे मोठे नुकसान कॉम्रेड बर्धन हे राजकारणातील मोठे प्रस्थ होेते. नागपूरच नव्हे तर देशभरात त्यांना मान होता. त्यांनी कम्युनिस्ट पार्टी सोडली असती तर ते मोठ्या पदावर राहिले असते. परंतु त्यांनी तत्त्वाशी कधी तडजोड केली नाही. कामगारांसाठी ते आयुष्यभर लढले. त्यांची विचारसरणी वेगळी असली तरी ते महात्मा गांधी यांच्यासारखे जीवन जगले. त्यांच्या निधनाने पक्षासोबतच नागपूरचे मोठे नुकसान झाले.- गेव्ह आवारी,माजी खासदारकामगार चळवळ पोरकी झाली - बर्धन यांच्या निधनाने कामगार चळवळ पोरकी झाली आहे. आपले पूर्ण आयुष्य त्यांनी कम्युनिस्ट पक्ष आणि कामगार चळवळीला समर्पित केले होते. ते केवळ राजकीय पुढारीच नव्हते तर एक उत्तम सामाजिक कार्यकर्तेही होते. माझे आणि त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. त्यांच्या रूपात मी एक व्यक्तिगत मित्रही गमावला आहे.- दत्ता मेघे, माजी खासदार संघर्षशील नेत्याला देश मुकला- कामगारांसाठी आयुष्यभर झटणारे कॉ. ए.बी. बर्धन यांच्या निधनाने देश एका कर्मनिष्ठ, संघर्षशील नेत्याला मुकला आहे. बर्धन हे राजकारणापलिकडील प्रामाणिक व आदर्शवादी नेते होते. त्यांच्या निधनाने नागपूरसह देशाचे मोठे नुकसान झाले आहे. मी माझ्यातर्फे व भाजपातर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. - खा. अजय संचेतीकम्युनिस्ट चळवळीची हानी-एक सामान्य जीवन जगणारा नेता म्हणून कॉम्रेड बर्धन ओळखले जात. त्यांनी त्यांच्या कार्याने नागपूरचे नाव संपूर्ण जगात पोहोचविले. त्यांच्या अचानक जाण्याने कम्युनिस्ट चळवळीची मोठी हानी झाली. ती पोकळी भरून निघणे अशक्य आहे.- कृपाल तुमाने,खासदार, रामटेक