मसूद अज़हरविरुद्ध इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस
By Admin | Updated: May 18, 2016 04:45 IST2016-05-18T04:45:41+5:302016-05-18T04:45:41+5:30
मसूद अज़हर आणि त्याचा भाऊ अब्दुल रौफ या दोघांविरुद्ध नव्याने रेड कॉर्नर नोटीस जारी

मसूद अज़हरविरुद्ध इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस
नवी दिल्ली : पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावरील दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात इंटरपोलने मंगळवारी प्रतिबंधित दहशतवादी संघटन जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अज़हर आणि त्याचा भाऊ अब्दुल रौफ या दोघांविरुद्ध नव्याने रेड कॉर्नर नोटीस जारी केली. राष्ट्रीय तपास संस्थेने पठाणकोट हल्ल्याचा कट रचल्याच्या आरोपात अज़हर आणि रौफ या दोघांविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केल्यानंतर इंटरपोलने ही रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे.