केरळमधला रेड अलर्ट हटवला, बचावकार्याला आला वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2018 11:17 AM2018-08-19T11:17:33+5:302018-08-19T11:18:03+5:30

पुरानं अक्षरशः वेढलेल्या केरळची परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. शुक्रवार आणि शनिवारी पाऊस कमी झाल्यानं 14 जिल्ह्यांना दिलेला रेड अलर्ट हटवण्यात आला आहे.

The red alert in Kerala was deleted, the rescue came to the fore | केरळमधला रेड अलर्ट हटवला, बचावकार्याला आला वेग

केरळमधला रेड अलर्ट हटवला, बचावकार्याला आला वेग

Next

कोची- पुरानं अक्षरशः वेढलेल्या केरळची परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. शुक्रवार आणि शनिवारी पाऊस कमी झाल्यानं 14 जिल्ह्यांना दिलेला रेड अलर्ट हटवण्यात आला आहे. 9 ऑगस्टनंतर पहिल्यांदाच रेड अलर्ट हटवण्यात आला. पाऊस ओसरल्यानं बचावकार्याला वेग आला आहे. सरकार आणि एनडीआरएफची टीम मिळून बचावकार्य राबवत आहेत. एर्नाकुलम, पथनमथिट्टा आणि अलप्पुझा जिल्ह्यांतील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. मुसळधार पावसानं आलेल्या पुरात आतापर्यंत 350 जणांचा मृत्यू झाला आहे.

9 ऑगस्टनंतर 196 लोकांचा मृत्यू झाला तर, शनिवारी पुरात 22 लोक वाहून गेले. सध्या 6, 61,887 माणसांना 3466 रिलीफ कॅम्पमध्ये ठेवण्यात आलं आहे. घरदार, शेती सारेच नष्ट झाल्याने अनेक जण मानसिकरीत्या पुरते खचले आहेत, तर काहींच्या डोक्यावर परिणाम झाला आहे वा होत आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. रुग्णालयात जखमींबरोबरच मानसिक आजारांनी ग्रासलेल्या लोकांची संख्या मोठी असून, त्यात केवळ वृद्धच नव्हे, तर तरुण व लहान मुलेही आहेत. शाळा, महाविद्यालये कित्येक दिवसांपासून बंद आहेत. रुग्णालयांत कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे.

पावसाच्या सततच्या तडाख्यांमुळे सुमारे 10 हजार किलोमीटरचे रस्ते एक तर वाहून गेले आहेत, खचले आहेत वा त्यावर इतके खड्डे पडले आहेत की त्यावरून वाहने चालविणे आणि चालणेही धोक्याचे झाले आहे. ब-याच पुलांची अवस्थाही वाईट असून, काही पूल धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. अनेक पुलांवरून पाणी वाहत होते. ते ओसरल्यानंतर पुलांवर कचºयाचे ढिग दिसू लागले असून, ते हटविण्याचे काम सुरू आहे. अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाल्याने लोकांना अंधारात राहावे लागत आहे, मोबाइल चार्ज करता येत नसल्याने इतरांशी संपर्क तुटला आहे. पिण्याचे पाणीही दुषित झाले असून, पुण्यासह अनेक राज्यांतून तिथे रेल्वेने पाणीपुरवठा सुरू करण्यात येत आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी अन्नधान्य पाठविण्याचा निर्णय घेतला आहे, तर अन्नधान्य तसेच आर्थिक मदत पाठविण्यासाठी ती गोळा करण्याचे काम ब-याच संस्थांनी सुरू केले आहे.

Web Title: The red alert in Kerala was deleted, the rescue came to the fore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.