शिर्डीत ४७ मिमी़पाऊस कालव्याला शेतीसाठी आवर्तन सुटले

By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:20+5:302014-12-12T23:49:20+5:30

शिर्डी : गुरूवारी रात्री वादळ व गारांसह पडलेल्या जोरदार पावसाने शिर्डीला झोडपून काढले. पर्जन्यमापकानुसार शिर्डीला ४७ मिमी़ पाऊस पडल्याचे राहात्याचे नायब तहसीलदार राहुल कोताडे यांनी सांगितले़

Recurrence is left for 47 mmpous canal in Shirdi | शिर्डीत ४७ मिमी़पाऊस कालव्याला शेतीसाठी आवर्तन सुटले

शिर्डीत ४७ मिमी़पाऊस कालव्याला शेतीसाठी आवर्तन सुटले

र्डी : गुरूवारी रात्री वादळ व गारांसह पडलेल्या जोरदार पावसाने शिर्डीला झोडपून काढले. पर्जन्यमापकानुसार शिर्डीला ४७ मिमी़ पाऊस पडल्याचे राहात्याचे नायब तहसीलदार राहुल कोताडे यांनी सांगितले़
गुरूवारी रात्री आठच्या सुमारास हलका पाऊस सुरू झाला. नंतर अकराच्या सुमारास वादळ व विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरूवात झाली़ यावेळी गाराही पडल्या़ मध्यरात्रीच्या पावसानंतर आकाश सकाळी निरभ्र झाले़ मात्र सायंकाळी आकाशात पुन्हा ढगांनी गर्दी केली. शिंगवे, सावळेविहीर, पिंपळवाडी आदी गावांत पावसाने हजेरी लावली़ यात शिंगवे येथील एका घराचे पत्रे उडाल्याचे तर तालुक्यात उभ्या ज्वारीच्या पिकाचे नुकसान झाल्याचे राहुल कोताडे यांनी सांगितले़
दरम्यान, रात्री दहा वाजता गोदावरी उजव्या कालव्याला नांदूर-मध्यमेश्वर बंधार्‍यातून शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले़ सुरूवातीला अडिचशे क्युसेकने सोडलेल्या पाण्याचा विसर्ग सायंकाळी पाचशेपर्यंत वाढवण्यात आला़ या हंगामातील हे शेतीसाठीचे पहिले आवर्तन आहे़

Web Title: Recurrence is left for 47 mmpous canal in Shirdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.