जळगावला ६२ जागांसाठी पोलीस शिपाई पदाची भरती

By Admin | Updated: February 5, 2016 00:34 IST2016-02-05T00:34:13+5:302016-02-05T00:34:13+5:30

जळगाव: महाराष्ट्र पोलीस दलात शिपाई पदाची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. जळगाव जिल्‘ात ६२ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तीन फेब्रुवारीपासून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. १८ फेब्रुवारी अर्ज करण्याची शेवटची मुदत असून स्टेट बॅँकेत चलन (पैसे) भरण्याची अंतिम मुदत २२ फेब्रुवारी आहे. ३१ डिसेंबर २०१५ रोजी कमीत कमी १८ वर्ष पुर्ण तर जास्तीत जास्त २५ वर्ष वयोमर्यादा आहे. मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादेत उच्चतम सूट राहणार आहे.

Recruitment of police personnel for 62 seats in Jalgaon | जळगावला ६२ जागांसाठी पोलीस शिपाई पदाची भरती

जळगावला ६२ जागांसाठी पोलीस शिपाई पदाची भरती

गाव: महाराष्ट्र पोलीस दलात शिपाई पदाची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. जळगाव जिल्‘ात ६२ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तीन फेब्रुवारीपासून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. १८ फेब्रुवारी अर्ज करण्याची शेवटची मुदत असून स्टेट बॅँकेत चलन (पैसे) भरण्याची अंतिम मुदत २२ फेब्रुवारी आहे. ३१ डिसेंबर २०१५ रोजी कमीत कमी १८ वर्ष पुर्ण तर जास्तीत जास्त २५ वर्ष वयोमर्यादा आहे. मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादेत उच्चतम सूट राहणार आहे.
भरती केली जाणारी पदे ही ३१ डिसेंबर २०१६ अखेरपर्यंत रिक्त होणार्‍या संभाव्य पदाची गणना करुन जाहीर करण्यात आली आहेत. सध्या पोलीस दलात वाहन चालकाचे स्वतंत्ररित्या पदे भरली जात नसल्यामुळे पोलीस शिपाईपदी नियुक्ती झाल्यावर संबंधित विभागात वाहन चालकाचे कर्तव्य बजावणे बंधनकारक राहणार आहे. जाहीर केलेली पदे व आरक्षण यात बदल होण्याची शक्यता आहे, त्याचे अधिकार घटकप्रमुखास बहाल करण्यात आले आहेत.
अशी आहे शैक्षणिक अर्हता
उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परिक्षा (१२ वी) किंवा शासनाने या परिक्षेस समकक्ष म्हणून केलेली परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. राष्ट्रीय मुक्त विद्यालय नवी दिल्ली यांची सिनियर सेकंडरी स्कुल परिक्षा तसेच सीबीएसई बारावी या दोन्ही परिक्षा राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या समकक्ष आहेत. माजी सैनिक १५ वर्ष सेवा पुर्ण असणार्‍यांच्या बाबतीत दहावी उत्तीर्ण किंवा इंडीयम आर्मी सर्टीफिकेट ऑफ एज्युकेशन (आयएएससी) प्रमाणपत्र व १५ वर्ष सेवा पुर्ण नसलेल्यांच्या बाबतीत १२ वी उत्तीर्ण प्रमाणपत्र आवश्यक आहे.
दरम्यान, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार हिंदी संस्थानच्या परिक्षांना १२ वीशी समकक्ष म्हणून दिलेली मान्यता ही फक्त हिंदी शिक्षकांच्या जागेवर नेमणुकीसाठी विचारात घ्यावयाची असल्याने पोलीस भरतीसाठी समकक्ष म्हणून विचारात घेतली जाणार नाही.
अशा आहेत जागा
खुला अजा एकुण
४९ १३ ६२
सर्वसाधारण- १७ - ०३ -२०
महिला- १५- ०४- १९
खेळाडू- ०२- ०१- ०३
प्रकल्पग्रस्त - ०२- ०१- ०३
भुकंपग्रस्त- ०१- ००- ०१
माजी सैनिक - ०७- ०२- ०९
अंशकालिन पदवीधर -०२- ०१- ०३
पोलीस पाल्य - ०१- ००- ०१
गृहरक्षक दल-०२ - ०१- ०३
एकुण - ४९-१३ -६२

Web Title: Recruitment of police personnel for 62 seats in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.