शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नोकरशाहीत खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांची भरती, सरकारची महत्त्वाकांक्षी योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 07:12 IST

केंद्रीय लोकसेवा आयोगाने ४५ पदांसाठी दिली जाहिरात

- हरीश गुप्ता नवी दिल्ली :  एनडीए सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा भाग म्हणून नोकरशाहीत खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांची भरती करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रालयामध्ये संयुक्त सचिव, संचालक आणि उपसचिवांच्या प्रमुख पदांवर पंचेचाळीस विशेषज्ञ लवकरच रुजू होणार आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) शनिवारी ४५ पदांची जाहिरात दिली आहे.

अशा पदांवर सहसा आयएएस, आयपीएस आणि आयएफएस दर्जाचे अधिकारी असतात. मात्र, मंत्रालयामध्ये खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांना संधी देण्याची योजना एनडीए सरकारने २०१८ मध्ये सुरू केली होती. मात्र, त्यावेळचा अनुभव फारसा सकारात्मक नव्हता. ही योजना सुरुवातीच्या टप्प्यात होती.  

आणखी काही अधिकारीही लवकर बाहेर पडले. सौरभ मिश्रा यांना दोन वर्षांची मुदतवाढ मिळूनही त्यांनी बाहेर पडणे पसंत केले. मिश्रा यांच्या राजीनाम्यानंतर निवड झालेले पाच अधिकारी सेवेत राहिले. केंद्र सरकारने आता नव्याने जाहिरात दिल्यानंतर सरकारी विभागात आशावाद आणि धास्ती, असे मिश्र भाव पाहायला मिळत आहेत. 

पहिल्या तुकडीला ३१ ऑगस्ट २०१९ रोजी मंजुरीखासगी क्षेत्रातील अशा अधिकाऱ्यांच्या पहिल्या तुकडीला ३१ ऑगस्ट २०१९ रोजी मंजुरी देण्यात आली होती. तेव्हा असे ९ तज्ज्ञ अधिकारी संयुक्त सचिव पदावर रुजू झाले होते. एप्रिल २०१९ मध्ये यूपीएससीला ६००० अर्ज मिळाले होते. त्यापैकी ९ उमेदवारांची निवड करण्यात आली. यात काकोली घोष (आयआयटी, आयआयएम आणि ऑक्सफर्डच्या माजी विद्यार्थी) यांचा समावेश होता. मात्र, त्या कृषी विभागात रुजू होण्यापूर्वीच बाहेर पडल्या.  

टॅग्स :Employeeकर्मचारीGovernmentसरकार