विनातिकीट रेल्वे प्रवाशांकडून ३,११० कोटी रुपयांचा दंड वसूल
By Admin | Updated: April 12, 2017 01:04 IST2017-04-12T01:04:54+5:302017-04-12T01:04:54+5:30
रेल्वेतून फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत चालली आहे. रेल्वेला चुना लावणाऱ्या कोट्यवधी लोकांकडून रेल्वे अधिकाऱ्यांनी गेल्या चार वर्षांत ३,११० कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल केला आहे.

विनातिकीट रेल्वे प्रवाशांकडून ३,११० कोटी रुपयांचा दंड वसूल
- नितीन अग्रवाल, नवी दिल्ली
रेल्वेतून फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत चालली आहे. रेल्वेला चुना लावणाऱ्या कोट्यवधी लोकांकडून रेल्वे अधिकाऱ्यांनी गेल्या चार वर्षांत ३,११० कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल केला आहे.
गेल्या चार वर्षांत ६ कोटी ८८ लाख ४० हजार लोकांना विनातिकीट प्रवास करताना पकडण्यात आले आहे. गजानन कीर्तिकर आणि सुनील गायकवाड यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गोहाई यांनी लोकसभेत ही माहिती दिली.
रेल्वेत मेट्रोसारखे स्वयंचलित दरवाजे
मेट्रो रेल्वेच्या धर्तीवर स्वयंचलित दरवाजांची तिकीट पडताळणी प्रणाली लावण्याच्या मुद्यावर बोलताना ते म्हणाले की, दोन रेल्वेस्थानकांवर ही प्रणाली लावण्याचा प्रस्ताव असून, त्यासाठी ४.१६ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे.
यंदा झालेली वसुली...
- 1.86 कोटी प्रवाशांना यावर्षी फेब्रुवारीपर्यंत पकडण्यात आले.
- 855.1 कोटी रुपये फुकट्या प्रवाशांकडून दंड वसूल केला.
- 19.7लाख वेळा देशातील सर्व रेल्वे विभागांत चालू आर्थिक वर्षात फेब्रुवारी महिन्यापर्यंत विनातिकीट प्रवासी पकडण्यासाठी तपासणी करण्यात आली.