चोरट्याकडून ५६ हजारांचा मुद्देमाल रिकव्हर

By Admin | Updated: February 29, 2016 23:32 IST2016-02-29T23:32:02+5:302016-02-29T23:32:02+5:30

जळगाव : जिल्हापेठ पोलिसांनी घरफोडीच्या गुन्‘ात अटक केलेल्या चोरट्याकडून सोमवारी सुमारे ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल रिकव्हर केला. मुद्देमालात सोने-चांदीचे, दागिने व रोकडचा समावेश आहे.

Recovery of 56 thousands of thieves from the thieves | चोरट्याकडून ५६ हजारांचा मुद्देमाल रिकव्हर

चोरट्याकडून ५६ हजारांचा मुद्देमाल रिकव्हर

गाव : जिल्हापेठ पोलिसांनी घरफोडीच्या गुन्‘ात अटक केलेल्या चोरट्याकडून सोमवारी सुमारे ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल रिकव्हर केला. मुद्देमालात सोने-चांदीचे, दागिने व रोकडचा समावेश आहे.
दूध फेडरेशनजवळील दंगलग्रस्त कॉलनीतील अशोका अपार्टमेंटमध्ये २२ जानेवारीला जरिना सजाद बोहरा या शिक्षिकेच्या घरात चोरी झाली होती. त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून संदीप अजूर्ून गुजर (२८, रा.शेंदुर्णी, ता.जामनेर) याने सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल चोरला होता. त्यानंतर गणेश कॉलनीत घरफोडी करतांना त्याला नागरिकांनी पकडले होते. त्याच्याकडून जिल्हापेठ पोलिसांनी ३१ हजार ३८६ रुपयांची सोन्याची चेन व पेंडल, १५ हजार २७७ रुपयांचे कानातले टॉप्स, ९ हजारांची सोन्याची अंगठी व रोकड असा मुद्देमाल हस्तगत केला. दरम्यान, पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला सोमवारी दुपारी न्या.कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली. सरकारतर्फे ॲड.हेमंत मेंडकी यांनी तर आरोपीतर्फे ॲड.कुणाल पवार यांनी काम पाहिले.

Web Title: Recovery of 56 thousands of thieves from the thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.