दोन राज्यांमध्ये विक्रमी मतदान
By Admin | Updated: April 12, 2016 02:31 IST2016-04-12T02:31:30+5:302016-04-12T02:31:30+5:30
आसाम आणि प. बंगालमधील विधानसभा मतदारसंघात सोमवारी अनुक्रमे ८२.२१ आणि ७९.५१ टक्के एवढ्या विक्रमी मतदानाची नोंद झाली. आसाममध्ये किरकोळ हिंसाचाराच्या घटना

दोन राज्यांमध्ये विक्रमी मतदान
गुवाहाटी : आसाम आणि प. बंगालमधील विधानसभा मतदारसंघात सोमवारी अनुक्रमे ८२.२१ आणि ७९.५१ टक्के एवढ्या विक्रमी मतदानाची नोंद झाली. आसाममध्ये किरकोळ हिंसाचाराच्या घटना घडल्या. पोलिसांच्या गोळीबारात वृद्धाचा मृत्यू झाला.
माजी पंतप्रधान मनमोहनसिंग हे १९९१ पासून राज्यसभेत
आसामचे प्रतिनिधित्व करीत असून त्यांनी दिल्लीहून दिसपूर येथे
जाऊन तेथील शासकीय शाळेतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. (वृत्तसंस्था)
गोगोर्इंविरुद्ध गुन्हा
आसाममध्ये मतदान सुरू असताना सोमवारी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांना पत्रपरिषद घेणे भोवले. निवडणूक आयोगाने त्यांच्याविरुद्ध आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.