शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षी सरकारकडून अन्नधान्याची विक्रमी खरेदी, ९.५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १९ हजार कोटी जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 11:17 IST

पंतप्रधानांनी सांगितले की, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सरकारने १९ हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. याचा लाभ जवळपास १० कोटी शेतकऱ्यांना होईल.

नवी दिल्ली : शेती आणि बागायतीमध्ये यंदा शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन घेतले आहे. त्यानुसार, सरकारनेही किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) अन्नधान्याची विक्रमी खरेदी केली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा १० टक्के अधिक गहू खरेदी एमएसपीवर करण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आठवा हप्ता शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लाभधारकांच्या खात्यामध्ये वर्ग केला. त्यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना ही माहिती दिली. पंतप्रधानांनी सांगितले की, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सरकारने १९ हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. याचा लाभ जवळपास १० कोटी शेतकऱ्यांना होईल. पश्चिम बंगालमधील शेतकऱ्यांना या योजनेचा पहिल्यांदाच लाभ देण्यात आला आहे. कोरोनासाथीच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी सांगितले की, राज्य सरकारांनी औषधी आणि आवश्यक पुरवठ्याचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी. कोरोना हा देशाचा अदृश्य शत्रू असून, त्याचा सामना करीत आहे. त्याच्याशी आपण युद्धपातळीवर दोन हात करीत आहोत.मोदी यांनी म्हटले की, पंतप्रधान किसान सन्मान योजनेवर सर्व शेतकरी खुश आहेत. पंजाबातील शेतकरी विशेषत: खुश आहेत. अनेक शेतकऱ्यांनी समाजमाध्यमांवर टाकलेले समाधानाचे व्हिडिओ मी पाहिले आहेत.सेंद्रिय शेतीचे व्यावसायिक मॉडेल विकसित करणाऱ्या मेघालयातील एका शेतकऱ्यास मोदींनी सांगितले की, देशात १० हजार ‘शेतकरी उत्पादक संघटना’ स्थापन करण्यात येत आहेत. तुमचे व्यवसाय मॉडेल तुम्ही लोकप्रिय केले आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारने २०१९ साली पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जाते. दर तीन महिन्यांनी २ हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला जातो.

तुम्ही इतरांसमोर उदाहरण ठेवलेपंतप्रधानांनी योजनेच्या काही लाभार्थींशी वार्तालाप केला. बरड जमिनीचे सुपीक जमिनीत रूपांतरित करणाऱ्या आंध्र प्रदेशातील एका शेतकरी महिलेस मोदींनी सांगितले की, तुम्ही इतरांसाठी एक उदाहरण घालून दिले आहे. तुमचा आत्मविश्वास हा तुमच्या क्षमता आणि अनुभवाबद्दल बोलतो.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरीMarketबाजार