शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कमाईची 'सुवर्ण' संधी! मे महिन्यात गोल्ड बॉन्ड्सची विक्रमी विक्री, 54 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 17:43 IST

गेल्या एक वर्षात गोल्डवर 40 टक्के रिटर्न मिळाले आहेत. वर्ल्ड गोल्ड काउंसिलच्या एका रिपोर्टनुसार, 2020च्या पहिल्या तिमाहीदरम्यान गोल्डमध्ये जबरदस्त इन्वेस्टमेंट झाली. दरवर्षीचा विचार करता, यावेळी गोल्ड डिमांड 80 टक्क्यांनी वाढून 539.6 टन राहिली.

ठळक मुद्देसरकारने मे महिन्यात गोल्ड बॉन्ड्सच्या माध्यमातून 25 लाख यूनिट विकून 1,168 कोटी रुपयांची कमाई केली आहे.गोल्ड बॉन्डचा एक युनिट म्हणमजे एक ग्राम असतो.तज्ज्ञांच्यामते पुढील 12 महिन्यांत सोन्याचा भाव 54,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकतो.

नवी दिल्ली : सरकारने मे महिन्यात गोल्ड बॉन्ड्सच्या माध्यमातून 25 लाख यूनिट विकून 1,168 कोटी रुपयांची कमाई केली आहे. भारतीय रिझर्व बँकेने जारी केलेल्या आकड्यांवरून सहज लक्षात येते, की सॉवरेन गोल्ड बॉन्ड्सच्या माध्यमातून झालेली ही सर्वात मोठी कमाई आहे. हा गोल्ड बॉन्ड 11 ते 15 मेदरम्यान सब्स​क्रिप्शनसाठी खुला करण्यात आला होता. यात एक युनिट गोल्डचा भाव 4,590 रुपये एवढा होता. गोल्ड बॉन्डचा एक युनिट म्हणमजे एक ग्राम असतो.

एप्रिल महिन्यात 822 कोटींची कमाई -आतापर्यंत सॉवरेन गोल्ड बॉन्डचे 39 सब्सक्रिप्शन जारी करण्यात आले आहेत. गोल्ड बॉन्डच्या माध्यमाने मे महिन्यापूर्वी सर्वाधिक कमाई ऑक्टोबर 2016मध्ये झाली होती. ऑक्टोबर 2016मध्ये एकूण 1,082 कोटी रुपयांचे सब्सक्रिप्शन झाले होते. यात एकूण 35.98 लाख यूनिट्सची विक्री झाली होती. एप्रिल 2020मध्ये गुंतवणूकदारांनी 17.73 लाख यूनिट्स  विकत घेतले. याची एकूण किंमत 822 कोटी रुपये एवढी आहे.

जाणून घ्या; पॉझिटिव्ह रुग्णांपासून 'किती ते किती दिवसांपर्यंत' पसरतो कोरोना? संशोधनाचा मोठा दावा

सोन्याच्या गुंतवणुकीत सर्वाधिक तेजी -गेल्या एक वर्षात गोल्डवर 40 टक्के रिटर्न मिळाले आहेत. वर्ल्ड गोल्ड काउंसिलच्या एका रिपोर्टनुसार, 2020च्या पहिल्या तिमाहीदरम्यान गोल्डमध्ये जबरदस्त इन्वेस्टमेंट झाली. दरवर्षीचा विचार करता, यावेळी गोल्ड डिमांड 80 टक्क्यांनी वाढून 539.6 टन राहिली.

CoronaVirus News : चिंताजनक! सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या जगातील टॉप 10 देशांमध्ये पोहोचला भारत, इराणला टाकले मागे

54,000 हजारांवर जाऊ शकतो सोन्याचा भाव -सोन्याचा भाव पुन्हा एकदा 47,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्याही पुढे गेला आहे. काही तज्ज्ञांच्यामते पुढील 12 महिन्यांत सोन्याचा भाव 54,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकतो. गोल्ड बॉन्डमध्ये इनव्हेस्ट करणाऱ्यांना सोन्याचे दर वाढण्याचा फायदा तर मिळतोय. पण 2.5 टक्के निश्चित व्याजही मिळते. 

CoronaVirus News: कोरोनाचा कहर वाढला; 'हे' 25 जिल्हे ठरतायत देशाची डोकेदुखी, महाराष्ट्रातील तब्बल 6 जिल्ह्यांचा समावेश

पुढील सब्सक्रिप्शन केव्हा होणार खुले?आपल्याला हे माहीत असणेही आवश्यक आहे, की या बॉन्ड्सचा कालावधी 8 वर्षांचा असतो आणि 5व्या वर्षानंतरच प्रीमॅच्युअर विड्रॉल केले जाऊ शकते. आरबीआयने म्हटले आहे, की 8 जूनपासून गोल्ड बॉन्ड्सचे पुढील सब्सक्रिप्शन खुले होईल.

CoronaVirus News: संपूर्ण जग वाट बघतय; पण, ऑक्सफर्डच्या वैज्ञानिकानेच अर्धी करून टाकली व्हॅक्सीनची आशा

टॅग्स :GoldसोनंReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकbankबँकIndiaभारतInvestmentगुंतवणूक