ललित मोदींना पद्म देण्याची राजेंनी केली होती शिफारस

By Admin | Updated: July 8, 2015 23:46 IST2015-07-08T23:46:20+5:302015-07-08T23:46:20+5:30

आयपीएलचे घोटाळेबाज माजी आयुक्त ललित मोदी यांना व्हिसासाठी मदत केल्याने गोत्यात आलेल्या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत

The recommendation was made by the politician to give Padma to Lalit Modi | ललित मोदींना पद्म देण्याची राजेंनी केली होती शिफारस

ललित मोदींना पद्म देण्याची राजेंनी केली होती शिफारस

नवी दिल्ली : आयपीएलचे घोटाळेबाज माजी आयुक्त ललित मोदी यांना व्हिसासाठी मदत केल्याने गोत्यात आलेल्या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. २००७ साली राजे सरकारने मोदी यांना पद्म पुरस्कार देण्याची शिफारस केली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राजे यांनी क्रीडा परिषदेच्या माध्यमाने मोदी यांचे नाव देशातील या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी पुढे केले होते. या शिफारस पत्रात राज्य सरकारने ललित मोदी यांनी राजस्थानात उभारलेले औद्योगिक साम्राज्य आणि क्रिकेटच्या विकासात दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली होती.
चॅम्पियन्स लीगच्या सहा सामन्यांच्या आयोजनात मोदींनी राज्याला कशी मदत केली याचाही उल्लेख या पत्रात करण्यात आला होता. (वृत्तसंस्था)

Web Title: The recommendation was made by the politician to give Padma to Lalit Modi