पेटीएमवरून करा जिओचं 303 रुपयांचं रिचार्ज, मिळणार 30 रुपयांची सूट
By Admin | Updated: March 9, 2017 20:46 IST2017-03-09T20:46:40+5:302017-03-09T20:46:40+5:30
पेटीएमवरून रिलायन्स जिओचं 303 रुपयांचं रिचार्ज केल्यास 30 रुपयांची घसघशीत सूट दिली आहे.

पेटीएमवरून करा जिओचं 303 रुपयांचं रिचार्ज, मिळणार 30 रुपयांची सूट
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - पेटीएमनं डिजिटल माध्यमांत एक नवीच क्रांती घडवून आणली आहे. भारतात मोबाइल पेमेंट आणि कॉमर्स प्लॅटफॉर्म असलेला पेटीएम ग्राहकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. सर्व आर्थिक व्यवहारांसाठी पेटीएम सुरक्षित असल्याचं अनेकांचं मत आहे.
पेटीएमला रिझर्व्ह बँकेचा परवाना असून, डिजिटल स्वरूपात पैसे साठवणे आणि क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग यांच्याऐवजी आर्थिक व्यवहार करणे सहजशक्य झाले आहे. आता पेटीएमवरून रिलायन्स जिओचं 303 रुपयांचं रिचार्ज केल्यास 30 रुपयांची घसघशीत सूट दिली आहे. त्यामुळे पेटीएमद्वारे तुम्ही रिलायन्स जिओचं रिचार्ज केल्यास तुम्हाला फक्त 273 रुपये मोजावे लागणार आहेत.
पेटीएमनं टेलिकॉम ऑपरेटर्सच्या यादीत आता रिलायन्स जिओचाही समावेश केला आहे. आतापर्यंत रिलायन्स जिओचं 303 आणि 499 रुपयांचं रिचार्ज माय जिओ अॅपवरून केलं जात होतं. मात्र आता पेटीएमच्या माध्यमातूनही तुम्हाला जिओचं रिचार्ज करता येणार आहे. पेटीएमनं स्वतःच्या वेबसाईटवर त्यासाठी एक खास लिंकही दिली आहे.
पेटीएमच्या माध्यमातून रिचार्ज केल्यास मिळणार तीन फायदे
1. दोनदा रिचार्ज केल्यास तुम्हाला 30 रुपयांपर्यंत सूट देण्यात येणार आहे.
2. प्रत्येक रिचार्जवर तुम्ही सिनेमाची तिकीट विकत घेतल्यास तुम्हाला 150 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार
3. 303 रुपयांच्या प्रत्येक रिचार्जवर जिओचा 201 रुपयांचा जिओ एड ऑन पॅक मोफत मिळणार, तर 499 रुपयांच्या रिचार्जवर 301 रुपयांचा जिओ एड ऑन पॅक मोफत मिळणार आहे.