पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

By Admin | Updated: July 16, 2015 03:49 IST2015-07-16T03:49:26+5:302015-07-16T03:49:26+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू दौऱ्यावर येणार असताना पाकिस्तानी सैनिकांनी बुधवारी जम्मू जिल्ह्याच्या अखनूर सेक्टरमध्ये उखळी तोफांचा मारा करून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.

Rebirth of Pakistan Against Corruption | पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

जम्मू : पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू दौऱ्यावर येणार असताना पाकिस्तानी सैनिकांनी बुधवारी जम्मू जिल्ह्याच्या अखनूर सेक्टरमध्ये उखळी तोफांचा मारा करून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला तर सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) एका जवानासह तीन जण जखमी झाले.
बीएसएफ जवानांनीही प्रत्युत्तरात कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत ही चकमक सुरू होती. त्यानंतर पाकी सैनिकांनी सीमेवरील लोकवसाहतींना लक्ष्य बनवून लहान शस्त्रांनी गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा सुरू केला.
भालवाल भार्थ, मालाबेला, सिदेरवान आदी परिसरासह सीमेवरील चौक्यांनाही याचा फटका बसला.
तीन उखळी तोफा कनाचक सेक्टरच्या बऱ्याच आत येऊन पडल्या. यात पोलीदेवी नामक एका ४२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर रमेशकुमार (२४) आणि उधादेवी (३८) हे दोघे जखमी झाले.

पाकने कॅमेरे काढले
बारमेर - भारताने कडाडून विरोध केल्यानंतर पाकिस्तानने बारमेर भागातील आंतरराष्ट्रीय सीमेवर लावलेले कॅमेरे काढून घेतले आहेत. गेल्या गुरुवारी सीमा सुरक्षा दलाने विरोध केल्यानंतर जैसलमेर सीमेवरील कॅमेरे काढण्यात आले होते. त्यावेळी बारमेर भागातील कॅमेरे तसेच होते, ते आता काढण्यात आले आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: Rebirth of Pakistan Against Corruption