पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:35+5:302015-02-15T22:36:35+5:30

जम्मू : शस्त्रसंधीचे पुन्हा एकदा उल्लंघन करीत पाकिस्तानच्या रेंजर्सनी शनिवारी सकाळी जम्मू जिल्‘ातील आरएस पुरा क्षेत्रातील तावी भागात अंदाधुंद गोळीबार केला. पाकिस्तानी रेंजर्सनी सकाळी ११ वाजता भारतीय चौक्यांच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबाराला भारतीय जवानांनी गोळीबारानेच प्रत्युत्तर दिले, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Rebirth of Pakistan Against Corruption | पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

्मू : शस्त्रसंधीचे पुन्हा एकदा उल्लंघन करीत पाकिस्तानच्या रेंजर्सनी शनिवारी सकाळी जम्मू जिल्ह्यातील आरएस पुरा क्षेत्रातील तावी भागात अंदाधुंद गोळीबार केला. पाकिस्तानी रेंजर्सनी सकाळी ११ वाजता भारतीय चौक्यांच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबाराला भारतीय जवानांनी गोळीबारानेच प्रत्युत्तर दिले, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
गेल्या २४ तासांत पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची ही दुसरी वेळ आहे. काल रात्रीही पाकिस्तानी सेनेने आरएस पुरातील आंतरराष्ट्रीय सीमेवर उखळी तोफांचा मारा केला होता. हे तोफगोळे निर्जन स्थळी पडून फुटल्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही, असे हा अधिकारी म्हणाला. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी निवारी पूंछ जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्नही हाणून पाडला होता. सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास चार-पाच दहशतवादी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसल्यानंतर बीएसएफने त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर ते पुन्हा पाकिस्तानच्या हद्दीत पळून गेले. (वृत्तसंस्था)

Web Title: Rebirth of Pakistan Against Corruption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.