शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकातील बंडखोर आमदार राजीनाम्यांवर ठाम; पेच कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 04:58 IST

सत्ताधारी आघाडीतील १५ बंडखोर आमदार राजीनाम्यांवर ठाम राहिल्याने कर्नाटकमधील राजकीय नाट्याचा तिढा रविवारीही कायम राहिला.

बंगळुरु : सत्ताधारी आघाडीतील १५ बंडखोर आमदार राजीनाम्यांवर ठाम राहिल्याने कर्नाटकमधील राजकीय नाट्याचा तिढा रविवारीही कायम राहिला. ‘परत आलात तर तुमच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील’, असे गाजर दाखवून काँग्रेसने बंडखोरांना परत आणण्याचा खूप आटापिटा केला, पण सोडून गेलेला एकही आमदार राजीनामा मागे घेण्यास राजी झाला नाही. उलट शनिवारच्या १५ तासांच्या वाटाघाटीनंतर जे स्वत: राजीनामा मागे घेऊन इतरांनाही सोबत घेऊन परत येतील, अशी काँग्रेसला खात्र होती ते एम. टी. नागराजही मुंबईला निघून गेले.काँग्रसचे वजनदार संकटमोचक डी. के. शिवकुमार यांनी बंडखोर आमदारांना राजीनामे मागे घेण्यासाठी त्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे गाजर दाखवितानाच विश्वासदर्शक ठरावावरील मतदानात सहभागी न झाल्यास अपात्रतेच्या कारवाईची धमकीही दिली. राजीनामा दिलेले परंतु मुंबईस न गेलेले काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार रामलिंग रेड्डी यांनीही ‘राजीनाम्याविषयी काहीच बोलणार नाही’, असे सांगितले. काँग्रेसच्या आशावादावर विरजण टाकले. त्यांच्या मुलीनेही आमदारकीचा राजीनामा दिला असून तिचा निर्णय ती घेईल, असे रेड्डी म्हणाले.कुमारस्वामी सरकारवरील विश्वासदर्शक ठराव फेटाळला जाण्यासाठी राजीनामे दिलेल्या आमदारांनी त्यावेळी सभागृहात न फरकणेही पुरेसे ठरेल. सर्वोच्च न्यायालयाने मनाई केल्याने आपल्या राजीनाम्यांवर निदान मंगळवारपर्यंत तरी निर्णय होणार नाही या खात्रीने त्यांच्या मुंबईतच राहण्याच्या मनसुब्याला बळ मिळाले आहे.>‘राजीनामा द्या, अन्यथा विश्वासदर्शक ठराव मांडा’मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी बहुमत गमावले असल्याने त्यांनी एकतर लगेच सन्मानाने राजीनामा द्यावा अन्यथा दिलेल्या शब्दाप्रमाणे सोमवारीच विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडावा, असा आग्रह भाजपचे विरोधीपक्षनेते बी. एस. येदियुरप्पा यांनी लावून धरला. त्यासोबतच मुंबईत तळ ठोकलेल्या बंडखोर आमदारांनी किमान बुधवारपर्यंत तरी बंगळुरात न परतण्याचे ठाम संकेत दिल्याने विश्वासदर्शक ठराव मांडला तरी तो जिंकायचा कसा, ही मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची डोकेदुखी कायम आहे.

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणkumarswamyकुमारस्वामी