अरुणाचलमध्ये पुन्हा सरकार स्थापनेस खीळ
By Admin | Updated: February 18, 2016 07:05 IST2016-02-18T07:05:14+5:302016-02-18T07:05:14+5:30
अरुणाचल प्रदेशमध्ये राज्यपालांना नव्या सरकारचा शपथविधी करण्यास मनाई करणारा आदेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी केंद्रीय मंत्रिमंडळाने राज्यात लागू करण्यात

अरुणाचलमध्ये पुन्हा सरकार स्थापनेस खीळ
नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशमध्ये राज्यपालांना नव्या सरकारचा शपथविधी करण्यास मनाई करणारा आदेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी केंद्रीय मंत्रिमंडळाने राज्यात लागू करण्यात आलेली राष्ट्रपती राजवट मागे घेण्याची शिफारस राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे केली.
मात्र, यानंतर लगेचच सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसच्या १४ बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाशी संबंधित दस्तऐवजांचे वाचन करेपर्यंत अरुणाचलमधील परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिल्याने राज्यात नवे सरकार स्थापण्याच्या दिशेने सुरू असलेल्या हालचालींना खीळ बसली आहे.