शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

हरयाणात बंडखोरांनी वाढविली भाजप, काँग्रेसची काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 01:25 IST

हरयाणात विधानसभा निवडणुकीत सतारूढ भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेससाठी बंडखोर डोकेदुखी ठरत आहेत. अनेक बंडखोर अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. राज्यात २१ रोजी मतदान होणार आहे.

चंदीगड : हरयाणात विधानसभा निवडणुकीत सतारूढ भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेससाठी बंडखोर डोकेदुखी ठरत आहेत. अनेक बंडखोर अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. राज्यात २१ रोजी मतदान होणार आहे.रेवाडीतील भाजपचे विद्यमान आमदार रणधीर कापडीवास यांनी सांगितले की, आपण अपक्ष निवडणूक लढविणार आहोत. गुडगावचे भाजप आमदार उमेश अग्रवाल यांनी पत्नी अनिता यांना अपक्ष म्हणून मैदानात उतरविले आहे. देवीलाल यांचे चिरंजीव आणि काँग्रेसचे नेते रणजित सिंह चौटाला तिकीट न मिळाल्याने रानियामधून अपक्ष निवडणूक लढवीत आहेत. काही मतदारसंघ असे आहेत ज्या ठिकाणी बंडखोर थेट निवडणुकीत उतरले नाहीत; पण त्यांनी पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध बंडाचे निशाण फडकाविले आहे. भाजपने कापडीवास यांच्याविरुद्ध सुनील मुसेपूर यांना तिकीट दिले आहे. आपण निवडणूक का लढवीत आहात? असे विचारले असता कापडीवास म्हणाले की, मी भाजपचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे; पण मला कोणत्या गोष्टीची किंमत चुकवावी लागत आहे ते माहीत नाही. या मतदारसंघात एका बाहेरच्या उमेदवाराला तिकीट देण्यात आले तेव्हा समर्थकांनी मला आग्रह केला की, आपण निवडणूक लढायला पाहिजे. भाजपने विद्यमान ४८ आमदारांपैकी १२ जणांना उमेदवारी नाकारली आहे. भाजप आणि काँग्रेसशिवाय इंडियन नॅशनल लोकदल, शिरोमणी अकाली दल, जननायक जनता पाटी, बहुजन समाज पाटी, आम आदमी पाटी, स्वराज इंडिया निवडणूक मैदानात आहेत.अशोक तंवर यांचा राजीनामाकाँग्रेसच्या गोटातही अंतर्गत कलह आहे. प्रदेश काँग्रेसचे प्रमुख अशोक तंवर यांनी हरयाणातील तिकीट वाटपात भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तंवर यांनी शनिवारी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. निवडणुकीच्या काही दिवस अगोदर तंवर यांना हटवून पक्षाने कुमारी शैलजा यांना पक्षाच्या राज्य शाखेचे प्रमुख बनविले होते.काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठविलेल्या राजीनाम्यात तंवर यांनी म्हटले आहे की, पक्षाला संपविण्याचा कट केला जात आहे. एका वृत्तसंस्थेला बोलताना ते म्हणाले की, आपल्यासमोर पक्ष सोडण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा