शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

'ती' एक ठिणगी पडली अन् अमिताभ-अमरसिंह यांची 'जय-वीरू'सारखी जिगरी दोस्ती तुटली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 12:10 IST

आठ वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेमुळे तुटली अमिताभ आणि अमरसिंह यांची मैत्री

मुंबई: कधीकाळी अमिताभ बच्चन यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे राज्यसभेचे खासदार अमर सिंह यांनी काल संपूर्ण बच्चन कुटुंबाची माफी मागितली. गेल्या काही वर्षांपासून सिंह वारंवार बच्चन कुटुंबावर टीका करत होते. त्यामुळे अनेकदा सिंह विरुद्ध बच्चन कुटुंब असा संघर्ष पाहायला मिळाला. अखेर तब्बल आठ वर्षांनंतर सिंह यांनी त्यांच्या वर्तणुकीबद्दल क्षमा मागितली.सिंह आणि बच्चन कुटुंबाचा वाद अतिशय जुना आहे. मात्र त्याहीपेक्षा जुनी आहे त्यांची मैत्री. कधीकाळी सिंह आणि बच्चन कुटुंबीयांचे अतिशय सलोख्याचे संबंध होते. मात्र एका वादामुळे सिंह आणि बच्चन यांच्यात दरी निर्माण झाली. खुद्द सिंह यांनी एका मुलाखतीत वादाची ठिणगी नेमकी कुठे पडली, यावर भाष्य केलं होतं. २०१२ मध्ये अनिल अंबानी यांच्या घरी एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी अमर सिंह आणि जया बच्चन यांचा वाद झाला. त्यानंतर दोन्ही कुटुंब एकमेकांपासून दूर गेली. 

जया बच्चन यांच्यासोबत झालेल्या वादात अमिताभ यांनी आपली बाजू घ्यावी, असं अमर सिंह यांना वाटत होतं. मात्र अमिताभ यांनी जया यांची बाजू घेतली. ही गोष्ट अमर सिंह यांना खटकली. त्यामुळे नाराज झालेले अमर सिंह वारंवार अमिताभ यांच्या कुटुंबावर तोंडसुख घेऊ लागले. बच्चन कुटुंबात वाद असल्याचं, अमिताभ अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे ते उघडपणे म्हणू लागले. 
बच्चन कुटुंबानं अमर सिंह यांच्या विधानावर प्रतिक्रिया देणं कायम टाळलं. अमिताभ यांनी फक्त एकदा यावर भाष्य केलं. अमर सिंह माझे मित्र आहेत आणि त्यांना बोलण्याचा अधिकार आहे, अशा मोजक्या शब्दांत अमिताभ या वादावर व्यक्त झाले. अखेर आठ वर्षांनंतर सिंह यांनी अमिताभ आणि त्यांच्या कुटुंबाची माफी मागितली. सध्या अमर सिंह यांच्यावर सिंगापूरमधल्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिथून त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून अमिताभ आणि त्यांच्या कुटुंबीयांची क्षमा मागितली आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

भारतासोबत ट्रेड डील करण्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनीच उपस्थित केली शंका

तरुण शेतकऱ्यांना मोदींचं गिफ्ट! व्यवसायासाठी सरकार देणार 3.75 लाख रुपये, असा घ्या फायदा... 

भारतातल्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; यंदा मिळणार 'इतकी' पगारवाढ

Jammu And Kashmir : त्राल चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

७३ हजार लोकांना संसर्ग; कोरोनाचे १९०० बळी

टॅग्स :Amitabh Bachchanअमिताभ बच्चनJaya Bachchanजया बच्चनAnil Ambaniअनिल अंबानी