शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

बापरे बाप! 10 हजार पदांसाठी तब्बल 95 लाख 51 हजार अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 08:45 IST

देशभरात रेल्वेमध्ये कॉन्स्टेबल पदासाठी 8,619 आणि सब-इंस्पेक्टर पदासाठी 1120 जागा काढण्यात आल्या आहेत. या दोन्ही पदांसाठी आत्तापर्यंत 95 लाख 51 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत.

ठळक मुद्देदेशभरात रेल्वेमध्ये कॉन्स्टेबल पदासाठी 8,619 आणि सब-इंस्पेक्टर पदासाठी 1120 जागा काढण्यात आल्या आहेत. 10 हजार जागांसाठी तब्बल 95 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त झाल्यानंतर परिक्षेचे नियोजन करणे मोठे आव्हानात्मक काम असून यावर मात करण्यासाठी केंद्रीय संगणकीय सिस्टिम तयार करण्यात येणार.

नवी दिल्ली - बेरोजगारी ही देशापुढील सर्वात मोठी समस्या असून दरवर्षी लाखो विद्यार्थी महाविद्यालयातून पदवी संपादन करून नोकरीच्या शोधात बाहेर पडत असतात. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रत्येकाचीच धडपड सुरू असते. भारतीयरेल्वेमध्ये सध्या सुरक्षा रक्षकांची भरती करण्यात येत आहे. 10 हजार जागा रिक्त आहेत मात्र त्यासाठी आलेल्या अर्जांची संख्या ही चकीत करणारी आहे. 10 हजार जागांसाठी तब्बल 95 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे इतक्या लोकांची परिक्षा नेमकी कशी घ्यायची असा प्रश्न आता रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाला पडला आहे.

रेल्वे सुरक्षा बलाचे महासंचालक अरुण कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरात रेल्वेमध्ये कॉन्स्टेबल पदासाठी 8,619 आणि सब-इंस्पेक्टर पदासाठी 1120 जागा काढण्यात आल्या आहेत. या दोन्ही पदांसाठी आत्तापर्यंत 95 लाख 51 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त झाल्यानंतर परिक्षेचे नियोजन करणे मोठे आव्हानात्मक काम होणार आहे. यावर मात करण्यासाठी केंद्रीय संगणकीय सिस्टिम तयार करण्यात येणार आहे. तसेच यामध्ये प्रत्येक उमेदवाराला पदाप्रमाणे सिस्टिममध्ये वर्गीकृत केले जाणार आहे. याच आधारावर आता परिक्षा घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले. 

देशभरात आरपीएफच्या जवानांचाही डेटाबेस तयार केला जात आहे. पायलट प्रोजेक्टनुसार आजवर उत्तर आणि पूर्व रेल्वेच्या 9 हजार आरपीएसएफचा डेटाबेस तयार झाला आहे. त्याशिवाय सीसीटीव्ही मॉनिटरच्या आऊटसोर्सिंगचा निर्णय घेण्यात आला आहे. कॉन्स्टेबल पदासाठी महिलांच्या 4216 तर पुरुषांच्या 4403 जागांसाठी एकूण 76.60  लाख अर्ज आले आहेत. तर सब-इंस्पेक्टर पदासाठी महिलांच्या 301 आणि पुरुषांच्या 819 जागांसाठी एकूण 18.91 लाख अर्ज आले आहेत. 

टॅग्स :Railway recruitment 2018रेल्वेभरतीjobनोकरीrailwayरेल्वेIndiaभारत