शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

जनरल रावत यांच्या विधानानंतर पाकिस्तानचा संताप; लष्कराकडून थेट युद्धाची भाषा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 09:08 IST

आम्ही कायम युद्धासाठी सज्ज असल्याची पाकिस्तानची धमकी

नवी दिल्ली: संयुक्त राष्ट्राच्या महासभेतील भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट रद्द झाल्यानंतर आता दोन्ही देशांच्या लष्करांनी एकमेकांना इशारा दिला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये तीन पोलिसांची हत्या करण्यात आल्यानंतर भारताचे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली. यानंतर आता पाकिस्तानी लष्कराकडूनही भारताला धमकी देण्यात आली आहे. आम्ही एक अण्वस्त्र संपन्न देश असून कायम युद्धासाठी तयार आहोत, असं पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते आसिफ गफूर यांनी म्हटलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी तीन पोलीस कर्मचाऱ्यांची अतिशय निर्घृणपणे हत्या केली. यानंतर भारतानं न्यूयॉर्कमध्ये होणारी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचं भारतीय लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी स्वागत केलं. दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्यास सज्ज असल्याचंही त्यांनी म्हटलं. यानंतर लगेचच पाकिस्तानी लष्करानंही प्रतिक्रिया दिली. आम्ही अण्वस्त्र संपन्न असून कायम युद्धासाठी सज्ज आहोत. पाकिस्तानकडून शांतता राखण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र या शांततेच्या आवाहनाला कोणीही आमचा कमकुवतपणा समजू नये, असं पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते आसिफ मफूर यांनी म्हटलं. शनिवारी भारतीय लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची गरज व्यक्त केली होती. दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर देण्याची वेळ आली आहे. संवाद आणि दहशतवाद एकाचवेळी होऊ शकत नाही, असं रावत म्हणाले होते. 'आमच्या सरकारचं धोरण अतिशय स्पष्ट आहे. पाकिस्ताननं दहशतवादी कारवाया रोखाव्यात. पाकिस्तानकडून अतिशय निर्घृणपणे जम्मू काश्मीरमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे,' असं रावत यांनी म्हटलं होतं.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवानBipin Rawatबिपीन रावतTerrorismदहशतवाद